110 + JAY BHIM UKHANE MARATHI | JAY BHIM MARATHI UKHANE FOR MARRIAGE | जय भीम मराठी उखाणे

Jay Bhim ukhane in marathi ( Female/Male )

आम्ही पाहणार आहोत ( 👇 क्लिक करा )

या आर्टिकल मध्ये आम्ही पाहणार आहोत 130 New Jay bhim ukhane ( marathi )

Jay bhim ukhane marathi

1

बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालते
वाकून –रावांचं नाव घेते सर्वांचा मान
राखून…

2

तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली
बोधीवृक्षाखाली –रावांना जन्म
देणारी धन्य ती माउली…

3

तथागतांच्या मूर्तीला फुलं वाहते
वाकून –रावांचे नाव घेते तुमचा मान
राखून…

4

बुद्धाला पुजते मी बाबासाहेबांना
करते वंदन, –रावांशी जोडले आज
माझे पवित्र बंधन..

5

सावित्रीबाईंनी शिकवला शिक्षणाचा
धडा, बाबासाहेबांनी दिला
अन्यायाविरुद्ध लढा, –रावांच्या
व माझ्या जीवनात पडो सुख-समृद्धीचा
सडा…

jay bhim marathi ukhane for marriage

6

जीवन जगावे बुद्ध धर्माला अनुसरून,
–रावांचे नाव घेते बुद्धाला
वंदन करून…

7

भीमरावांना साथ होती
रमाईची, ज्योतीबांना साथ होती
सावित्राबाईंची, आज मी शपथ घेते
–रावांचा साथ निभावण्याची…

8

बाबासाहेबांनी दिला समानतेचा
व मानवतेचा संदेश, –रावांचं नाव घेऊन
करते मी गृह प्रवेश…

9

बाबासाहेबांना म्हणतात घटनेचे
शिल्पकार, –रावांना घातला २० मे ला
हार…

10

भीमरावांची नवरी सजली
रमाई,सजली सुंदर वरात, –रावांचं
नाव घेते –च्या दारात…

11

भीमरावानी केलं दलितांच्या जीवनाचं
सोनं, माझ्या नशिबात आहे –रावांचं
होणं…

12

शोभून दिसते भीमबा-रमाईची जोडी,
–रावांशी संसार करण्यात मला आहे
गोडी…

13

भीमराव आहे माझा अनमोल हिरा,
–रावांशी विवाह झाला हाच माझा
भाग्योदय खरा…

14

भगवान बुद्धांनी दिला अनमोल
विचारांचा ठेवा, –रावांचा सहवास
मला जन्मभर लाभावा…

15

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या
भीमाने, मान वर करून जगायला
शिकवले माझ्या भीमाने, –रावांशी
परिणय घडून आला सर्वांच्या
आशीर्वादाने…

16

सत्याग्रह करून भीमाने भरली
चवदार ओंजळ, –रावांचं नाव घेते
तुमच्या साठी स्पेशल…

Jay bhim ukhane marathi | jay bhim marathi ukhane for marriage

17

मंगलवेळी मंगलदिनी वंदन करते
तुला, –रावांचं नाव घेताना आनंद
होतो मला…

18

तथागत बुद्धाचा जन्म झाला लुम्बिनी
वनात, –रावांचं नाव घेते येऊ द्या
घरात…

19

सागराचे पाणी कधी आटणार
नाही,बाबांची आठवण कधी मिटणार
नाही, –रावांची साथ आयुष्यभर
सोडणार नाही…

20

अभिमानाने द्यावा जयभीमचा नारा,
–रावांचं नाव घेते करूया
भारत बुद्धमय सारा…

Jay Bhim ukhane marathi

21

बाबासाहेब आहेत घटनेचे शिल्पकार,
–रावांच्यासह ध्येय,अशा होवोत
साकार…

22

बुद्धाची अमृतवाणी चहूकडे पसरली,
–रावांचं नाव घ्यायला मी नाही
विसरली…

23

जिओ ने काढलं सर्वात छान सिम …च नाव घेऊन करते सर्वांना जयभीम!

24

‘रमाईने भीमासंगे सजवला नवकोटीचं संसार …रावांच्या साथीचे मानते मी आभार

25

बुद्ध पौर्णिमेला वाटले मी केशराचे पेढे आमचे सोडून बाकी सगळे वेडे

26

भारतभाग्यविधाता भीम माझा
येथे कुणा कळेना
….रावांचं नाव घेण्या
शब्द काही जुळेना

27

बहुजनांवर केली भीमाने किमया न्यारी
….राव म्हणजे सर्वांत भारी

28

भिमाकोरेगावात गाजले
महारांचे शौर्य
…रावांचं नाव घेताच
जागते मनात धैर्य.

29

बाबासाहेबांची सही म्हणजे सोन्याची
खान
…रावांसोबत करते मी शतशः प्रणाम

30

एका एका महाराने ५६ पेशवे मारले
…रावांच्या सोबतीत… वर्ष सरले

31

….ने मला रूप दिल ममतेच
…रावांसोबत उचलते पाऊल मी समतेचं

32

बुद्धानामाच्या गजरात मला पडली
साऱ्या जगाची भूल
…..च नाव घेते देऊन कमळाचं फूल

33

भीमजयंती उत्सवात डी जे वाजतो जोरात
…रावांचं नाव घेते ताल आणि सुरात

34

उभी होते अंगणात नजर गेली आकाशात
भीमाचा फोटो भारताच्या नकाशात

35

बाबासाहेबांनी दिली नागपुरात दीक्षाल
….राव करतील नेहमी माझी रक्षा

36

बहुजनांचे स्वप्न निर्मिले भीमाने चवदार तळ्याकाठी ….रावांचा नाव घेते तुम्हा सर्वांसाठी

37

बौद्ध झोपले पिंपळाखाली
रमा भीमा वारा घाली
….रावांसोबत गीत गाया
आकांक्षाही तयार झाली

38

बुध्द चरणी,भीम चरणीच
नमतो हा माथा
— रावांच्या साथीने
गृह प्रवेश करते आता.

39

आनंदाची भरती येते
जयंती सणाला
——– रावांची ओढ लागे
ह्या वेड्या मनाला.

40

चांदीच्या ताटात सोन्याचा घास
आज बाबासाहेबांमुळेच मिळतो
——– रावांचा आणि माझा जोडा
लाखात शोभून दिसतो.

41

बाबासाहेबांमुळेच आज
खायला मिळतो सोन्याचा घास
——– रावांचे नाव घेते
तुमच्यासाठी खास.

Jay Bhim marathi ukhane for marriage

42

स्त्रियांना मान-सन्मान
मिळवून देण्यासाठी
हिंदू कोड बिल हे विधेयक
बाबासाहेबांनी संसदेत मांडले
——– रावांसाठी
माहेर सोडले.

43

बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी
बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना
बाबासाहेबांनी केली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

44

परदेशी देश सुद्धा बाबासाहेबांच्या
कर्तृत्वाची देतात साक्ष
——– रावांचे नाव घेते
सर्वांनी द्या इकडे लक्ष्य.

45

Who Were The Shudras
हा ग्रंथ बाबासाहेबांनी
महात्मा ज्योतिबा फुले यांना
अर्पण केला
——– रावांचे नाव घ्यायला
सार्यानीं आदेश दिला.

46

मनुस्मृतीने नाकारले
पण
संविधानाने दिले
——– रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.

47

सुटा-बुटात बाबासाहेब
किती शोभून दिसतात
——– राव आणि माझा जोडा
आहे लाखात असे सारे म्हणतात.

48

मागासवर्गीय वर्गाला आरक्षणाचे
वरदान बाबासाहेबांनी मिळवून दिले
——– रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.

49

गरोदर स्त्रीला हक्काची पगारी सुट्टी
बाबासाहेबांनी मिळवून दिली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

50

प्रत्येक भारतीय नागरिकास समान
अधिकार दिला बाबासाहेबांच्या कायद्याने
——– रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.

51

बाबासाहेबांच्या २ वर्ष ११ महीने १८ दिवसाच्या
कष्टाचे फळ म्हणजे भारताची राज्यघटना
——– रावांबरोबर सुखाचा
संसार मी थाटला.

52

अस्पृश्यता ह्या आजारावर समतेचे
लस शोधणारा डॉक्टर म्हणजे
बाबासाहेब आंबेडकर
——– रावांनी दिला मला
सौभाग्याचा आहेर.

53

झोपडीत राहणाऱ्या बाबासाहेबांनी
पुस्तकांसाठी बंगला बांधला
——– रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.

54

दानवीर ,विशाल ह्दयी बाबासाहेबांनी
गांधीजींचे प्राण वाचविले
——– रावांच्या नावाचं कुंकू
कपाळी मी सजविले.

55

मानवी दु:खे दूर करण्यासाठी
गौतम बुध्दांनी महाभिनिष्क्रमण केले
——– रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.

56

व्हाॅयसरायच्या मंत्रीमंडळात
मजूर आणि बांधकाम
खात्याचे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी मानाचे स्थान मिळवले.
——– रावांच्या नावाचे कुंकू
कपाळी मी सजविले.

57

हूशार अस्पृश्य मुलांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे म्हणून बाबासाहेबांनी
फॉरेन स्कॉलरशिप प्रपोजल
ही योजना आमलात आणली
——– रावांबरोबर
आयुष्यभराची गाठ बांधली.

जय भीम मराठी उखाणे

58

नोकरी करणाऱ्या स्त्रियांना
प्रसुतीच्या वेळी पगारी रजा
बाबासाहेबांनी मिळवून दिली
——– सोबत असताना मला
नाही कशाची कमी.

59

तथागत गौतम बुध्द आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने
——– रावांबरोबर बांधते आयुष्यभराची गाठ
डोक्यावर सदैव असो मोठ्यांच्या
आशीर्वादाचा हात.

60

स्वातंत्र्य भारताचे पहिले विधी मंत्री होण्याचा
मान बाबासाहेबांना मिळाला
——– रावांच्या नावाचा
चुडा मी भरला.

61

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
बाबासाहेबांनी केली
——– रावांचे नाव घेते
ऐका ग साऱ्याजणी.

62

ग्रंथप्रेमी बाबासाहेबांनी
अन्यायकारी मनुस्मृती जाळली
——– रावांचे नाव घेऊन
सगळ्यांची आज्ञा मी पाळली.

63

नदीजोड प्रकल्पाची गरज
बाबासाहेबांनी त्याचवेळी सांगितली
——– रावांनी मला
आयुष्यभराची साथ मागितली.

64

बाबासाहेब म्हणजे
गोडातील साखर ,अन्नातील मीठ
——– रावांचे नाव घेते
ऐका सगळ्यांनी नीट

65

चवदार तळे पवित्र झाले
बाबासाहेबांच्या स्पर्शाने
——– रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.

66

दलितांसाठी बाबासाहेब
आईचा पदर झाले
——– रावांसाठी
माहेर सोडून सासरी आले.

67

हिंदु धर्मातुन बौद्ध धर्मात
बाबासाहेबांनी केले धर्मांतर
——– रावांचे नाव घेते
ठेवून सर्वाचा आदर.

68

अस्पृश्य समाजातील पहीले
मँट्रीक बाबासाहेब झाले
——– रावांसाठी
माहेर सोडून सासरी आले.

69

बुद्ध विहारी जाऊन करते
तथागत गौतम बुध्दांना वंदन
——– रावांबरोबर जोडते
आयुष्यभराचे बंधन.

70

सूर्यापेक्षा तेजस्वी चंद्रापेक्षा शीतल
कर्तृत्व आहे भीमाचे
——– राव धनी आहेत
माझ्या सौभाग्याचे.

71

बाबासाहेबांचा शाळेतील पहीला दिवस
विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो
——– रावांचे नाव घ्यायला
सगळ्याचा आदेश येतो.

72

विषमतावादी इतिहास पुसून
नवा इतिहास बाबासाहेबांनी निर्माण केला
——– रावांनी सौभाग्याचा
मान दिला.

73

अस्पृश्य म्हणून ज्याला
शिक्षणाचा अधिकार नव्हता
त्याच बाबासाहेबांनी बसविली
देशाची घडी
——– रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या वेळी.

74

पुरूषांप्रमाणेच स्त्रीयांना समान
अधिकारी मिळवून देणारा कायदा
बाबासाहेबांनी केला
——– रावांनी सौभाग्याचा
आहेर दिला.

75

मुक्या अस्पृश्य समाजाचे
मूकनायक म्हणून बाबासाहेब शब्द झाले
——– रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.

उखाणे जय भीम मराठी

76

बाबासाहेब परदेशी शिकायला असताना
रमाईच्या डोळ्यांना लागली बाबासाहेबांच्या परतीची आस
——– रावांचे नाव घेते
तुमच्यासाठी खास.

77

१४ एप्रिल सोन्याचा दिवस उगवला
भीमाईच्या पोटी रामजीचा पुत्र जन्मला
——–रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.

78

भीमाचे रामजी होते वडील
भीमाई होती आई
——–राव आहेत लेखनी
अन् मी त्यातील शाई.

79

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची साक्ष देते
विदेशी शहर ते लंडन
——– रावांबरोबर जोडते
आयुष्यभराचे बंधन.

80

बाबासाहेबांचे सकपाळ या
आडनावाचे आंबेडकर असे झाले
——– राव आणि माझी जोडी
लाखात एक शोभे.

81

पिंपळाच्या पानाला
बोधिवृक्ष म्हणतात
——– रावांचे नाव घ्यायला
सारेच आग्रह करतात.

82

बाबासाहेब म्हणजे
ज्ञानाचा महासागर
——– रावांसाठी
सोडले मी माहेर.

83

आधी दलितांच्या हाती फक्त झाडू असायचा
पण बाबासाहेबांनी पुस्तके दिली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

84

बाबासाहेबांनी केली
संविधानाची निर्मिती
——– रावांचे नाव घेते
गृहप्रवेशाच्या वेळी.

85

लेक मी बाबासाहेबांची
उपासिका गौतम बुध्दांची
——– रावांचे नाव घेते
सुन मी ——– ची

86

सुटा-बुटात बाबासाहेबांचा
रूबाब किती शोभून दिसतो
——– रावांचे नाव घ्यायला
नेहमी सगळ्यांचा आग्रह असतो.

87

कायद्याची निर्मिती
बाबासाहेबांनी केली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

88

पांढरी साडी नेसून
तथागत गौतम बुध्दांना पूजते
——– रावांच्या नावाचं कुंकू
कपाळी शोभते.

सुंदर जय भीम उखाणे

89

बाबासाहेबांची भिमाई होती माता
रामजी होते पिता
——– रावांच्या नावाने
भरला मी चुडा.

90

पिंपळाच्या पानावर
गौतम बुध्दांचे चित्र
——– चे नाव घ्याला
आग्रह करतात मित्र

91

भीमरावाचे बाबासाहेब झाले
रमाबाईची रमाई झाली
——– ही माझ्या
हृदयाची राणी झाली.

92

. बाबासाहेबांच्या पाठीशी
खंबीरपणे उभी होती रमाबाई
——– रावांचे नाव घेते
——– ची मी आई.

93

शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा
बाबासाहेबांनी दिला हा संदेश
——– रावांचे नाव घ्यायला
दिला सार्यानीं आदेश.

94

संविधानाच्या माध्यमातून
गरोदर स्त्रीला हक्काची पगारी सुट्टी
बाबासाहेबांनी मिळवून दिली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

95

बुद्ध आणि त्यांचा धम्म
हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला
——– रावांमुळे
सौभाग्याचा मान मिळाला.

96

अन्यायावर मात करते
बाबासाहेबांची लेखनी
——– रावांचे नाव घेते
आशीर्वाद द्यावा मोठ्यांनी

97

बाबासाहेबांच्या कल्पनेतूनच
रिर्झव बँकेची उभारणी झाली
——– राव सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

98

निळ निशाण
पिंपळाचे पान
——– राव आहेत
माझा जीव कि प्राण.

99

अन्यायवर मात करते
बाबासाहेबांची लेखनी
——– रावांचे नाव घेते
ऐका ग साऱ्याजणी.

100

१४एप्रिल
सण आमचा
——– रावांचे नाव घेते
मान ठेवून सर्वाचा.

101

बाबासाहेबांमुळे नष्ट झाला
अस्पृश्याच्या जीवनातील अंधकार
——– रावांबरोबर थाटते
सुखाचा संसार

102

समुद्राएवढे ज्ञान
बाबा साहेबांकडे होते
——–रावांचे नाव घेऊन
उंबरठ्यावरचे माप मी ओलांडते.

103

जन्म दिला आई-वडीलांनी
पण,
आयुष्य दिले बाबासाहेबांनी
——–रावांचे नाव घ्यायला
आग्रह केला सार्यानीं.

104

सत्ता स्थापन करणारी
रचना बाबासाहेबांनी
मांडली
——–राव आणि माझी जोडी
लाखात एक
शोभली.

105

मनुस्मृतीचे गलिच्छ विचार
पायदळी तुडविते
——– रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.

106

शिक्षण रूपी वागिणीचे दूध
बाबासाहेबांनी पाजलं
——–रावांचे नाव घ्यायला
सगळ्यांनी केला आग्रह.

107

वैशाखी पौर्णिमेला जन्म घेतला
गौतम बुध्दाने
——–रावांचे नाव घेते
पत्नी या नात्याने.

Jay Bhim ukhane in marathi

108

दिक्षाभूमीवर बाबासाहेबांनी
केले धर्मांतर
——– रावांचे नाव घेते
ठेवून सर्वाचा आदर.

109

महूच्या मातीमध्ये
भीमरत्न जन्मला
——– रावांमुळे
सौभाग्याचा मिळाला
मान मिळाला.

110

अस्पृश्य शिक्षणाची कळी
बाबासाहेबांनी फुलवली
सुवास त्यांचा पृथ्वी अंतापर्यंत
दरवळत राही
——– रावांचे नाव घेते
——– ची मी आई.

111

अस्पृश्यांसाठी बाबासाहेब
म्हणजे
आईचा पदर आणि वडिलांचा
कर्तव्यशील हात
——– रावांशी जोडते
आयुष्यभराची गाठ.

112

विषमतावादी समाजाला
समानतेचे अमृत बाबासाहेबांनी दिले
——– रावांसाठी माहेर सोडून
सासरी आले.

113

रक्ताचा एक थेंबही न सांडता
बाबासाहेबांनी घडवली
क्रांती
——– सोबत असताना
मला नाही कशाची कमी.

114

बाबासाहेबांसाठी ग्रंथालय हे मंदिर
आणि पुस्तक हे देव होते
——–रावांच्या नावाने
सौभाग्याचं लेणं मी घेते.

115

अस्पृश्यांचे नेतृत्व म्हणून
गोलमेज परिषद मध्ये
बाबासाहेबांनी मानाचे
स्थान मिळवले
——– रावांचे नाव घेऊन
उंबरठ्यावरचे माप
मी ओलांडते.

 

Read 👎 हे पण वाचा
190+ नवरीसाठी उखाणे | Marathi ukhane for female ( Navri sathi ukhane)
Ukhane marathi for Male

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *