वडिलांवरील मराठी मध्ये कविता: नमस्कार मित्रांनो, येथे आम्ही बाबांवरील (वडिल) कवितांच्या संग्रहातून वडिलांच्या जीवनाचे थोडे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या मराठी कविता आवडतील.
1
काल उशीला हात लावला
ओली जरा ती भासली.
सतत हसणाऱ्या बाबांची
आसवं कोणाला दिसली?चालायला शिकवते आई
बाबा घट्ट धरलेलं बोट.
तहानलेल्या घशाला
बाबा अमृताचा घोट.कुशीत आईच्या शिरल्यावर
ती अंगाई रोज गाते.
बाबांना मिठी मारायलाच
आयुष्य निघुन जाते.
बाबा वर कविता मराठी
2
बाबा तुम्ही पहिल पाऊल चालायला शिकवलात या जगात मानाने जगायला शिकवतात. बाबा तुमच्याशी मन मोकळेपणाने बोलायचे असते तुमच्याशी बोलायला बसले की, तुमच्या मनाचा विचार येतो आणि बोलायच म्हणतात म्हणतात. बोलायच राहुन जात. बाबा तुमचा धाक असतो तुम्ही समोर नसला की तुमचा भास होतो पण तुमच्या सहवासात एक मोठा आधार असतो. घरात लग्नाचा विषय असतो. तुम्हाला सोडून जायच नसतानाही. जाव लागतय या विचारने जास्त त्रास होतो. तुमच्या चेहर्यावर कर्जाचा विचाराने आलेला. तो तणाव मला दिसत असतो नका ना बाबा तुम्ही इतका विचार करु मी आणेल ओ पुन्हा, तुमच्या चेहर्यावर आनंदाचे अश्रू त्यासोबतच हसु.
3
बालपणी ना समजले असे कोडे बाप पणाचे उमगतो बाबा, जाणून महत्त्व आधारस्तंभाचे सदैव भले चिंतणारा खुशीत खुशी मानणारा समर्थ व कर्तुत्ववान घडवण्या तो झटणारा. प्रत्येक पाऊलावर तो भवितव्याचा ध्यास घेतो आयुष्याशी या झुंजताना खंबीरपणे साथ देतो आदर्श तो नीतिमूल्यांचा कणखर अन् हळवा वेळेतच आपले प्रेम त्याच्या डोळ्यांतही फुलवा.
4
स्वतच्या मनातल दुख लपवून सदैव चेहऱ्यावर आनंद ठेवनारा व्यक्ती म्हणजे बाबा.. खिशात रुपया देखील नसतांना मुलांच्या संपूर्ण इच्छा पुर्ण करण्याची तयारी ठेवणारा व्यक्ती म्हणजे बाबा.. मुलांच्या आयुष्यात कितीही संकट आल जरी घाबरू नको हि वेळ पण निघुन जाईल अस समजून सांगनारा व्यक्ति म्हणजे बाबा शाळे बाहेरील दूनियादारी शिकवून योग्य मार्ग दाखवनारा व्यक्ति म्हणजे बाबा.. मुलांना चालन शिकवन्या पासून तर योग्य जबाबदारी घेण्यालायक बनवनारा व्यक्ति म्हणजे बाबा..
5
विचार तु, आकार तू आमचे स्वप्न करी साकार तू घराचा तू स्तभं आणि आम्हा सर्वांचा अधार तू विचारानं सुंदर तू कर्तुत्वाने पुरंदर तू … आई जर का देव्हारा तर घरातलं मंदिर तू.. निर्णयाने खंबीर तू आम्हास भेटणारा धीर तू
6
भयावह दुनियेच्या वाटांवरती बाप एकटाच चालतो भविष्य सावरण्या लेकरांचे बाप हा कट्यांवर्ती वावरतो काबाडकष्ट करून तो माती मध्ये स्वत: चा घाम गाळतो सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो गमतीजमतीच्या गोष्टींमध्ये तो जिवलग मित्रासारखी साथ देतो चुकलात जर का तुम्ही एकदा तुम्हा समाजविण्या तो पुन्हा बापच असतो.
1 thought on “बाबा वर कविता | Father Marathi Poem”
बाप…
ह्या शब्दातच ऐक समाधान वाटतं
बाप…
ह्या शब्दातच सगळी भीती निघून जाते
बाप…
ह्या शब्दातच ह्या जगाशी ,
आलेल्या संकटाशी लढण्याची ताकद येते
बाप…
ह्या व्यक्तीबद्दल लिहावं तेवढं कमी आहे
बाप ह्या जगातला एकमेव असा व्यक्ती आहे
जो न बोलता सगळ शिकवून जातो
बाप…
ह्या शब्दातच ऐक समाधान वाटतं
बाप…
ह्या शब्दातच सगळी भीती निघून जाते
बाप…
ह्या शब्दातच ह्या जगाशी ,
आलेल्या संकटाशी लढण्याची ताकद येते
बाप…
ह्या व्यक्तीबद्दल लिहावं तेवढं कमी आहे
बाप ह्या जगातला एकमेव असा व्यक्ती आहे
जो न बोलता सगळ शिकवून जातो