Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

75

❤️अबोल मी
अव्यक्त तू …
भावना मी
प्रेम तू❤️❤️ अज्ञात मी
अजाण तू …
शब्द मी
अर्थ तू ..❤️❤️नयन मी
आसवे
आठवण मी
साथ तू…❤️

76

भेट आपली शेवटची होती…
माहित नव्हतं भेट आपली शेवटची होती,
निदान एक कप चहा सोबत घेतला असता.बोलणं झालं नसतं तरी चाललं असतं
पण तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडलं असतं....परत भेटला नाही तरी चालले असते पण ते क्षण मनात आठवण बनुन राहीले असते..आठवणी तुझ्या अधुऱ्या असत्या तरी चालले असते, पण मनाला तरी तसे बरे वाटले असते.
शेवटी आठवणी ताज्या राहिल्या असत्या जर आपलं मन मोकळं केलं असतं..थोडासा वेळ दिला असता तरी चाललं असतं
कारण हे आपलं भेटणं शेवटच होतं…शेवटच्या क्षणात डोळे भरून पाहिलं असत,
तर बरं झालं असतं,
तुला मनात साठवून तरी ठेवलं असतं…

77

प्रीत तुझी गात होती
जशी तुझी साथ होती …
प्रीत तुझी निराळी,
जशी वात हिव्हाळी होती.प्रीत तुझी बरी होती
रिमझीम पावसाची सरी होती.
प्रीत तुझी न्यारी,
जशी सप्तरंगी होळी होती

Leave a Comment