Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

81

माझ्या मनातलं..
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत…
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत…
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम करायला मला खुप आवडत…

82

पहिली भेट

माझ्या नकळत हातांचा स्पर्श
तुझ्या कोमल हाताना होतो
अशी नजर झुकवते तू
नी पाहून हर्ष मला होतो

इतकी का लाजलिस तू
गालावर छान खळी ती पडते
पाहुनी रंग गुलाबी गालांचा
माझी धडधड वाढवून जाते

केसांना मागे बोटांनी सारत
मला नजर चुकवून तू बघते
तुझ्या निशब्द त्या भावनांची
माझ्या मनाला जाणीव होते

तू अबोल भासलीस जरीही
ती आपली पहिली भेट होती
तुझ्या डोळ्यांनी सांगितली गोष्ट
तू थोडीशी घाबरली होती

 

MARATHI PREM KAVITA

83

पाहिले प्रेम
आयुष्यात न विस्रनारी गोष्ट म्हणजे
पहिलं वहिलं प्रेम अस्त
हिवाळ्यातल्या गवतावर चमकनार
मोत्या सारख द्व अस्त
आपल्या पहिल्या प्रेमाला
कशाचीच उपमा देता येत नाही
जरी आपण दुसरे प्रेम केले
तरी त्याला पहिल्या प्रेमाची
सर कधी येत नाही
दोघांच ही पहिल प्रेम आहे
अस अखाद्च उदाहरण बघायला मीळत
नाही तर हल्ली दोघत्ल एक
दूसरीकडून भटकून आलेलं असतं
काही झाले तरी पहिल्या प्रेमाची
मजाच असते एक वेगळी
आयुष्यभर पुरेल एवढी
असते ती शिदोरी
असते ती शिदोरी………..

Leave a Comment