मनाची व्यथा
सारखं वाटत मनात
तुझाच चेहरा ठेवावा साठवून….
जीवनाचा प्रत्येक क्षण जगावा
फक्त तुलाच आठवून…..आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात
असावी फक्त तुझीच साथ….
कधी दुःखात तर कधी सुखात
तू द्यावा हाथात हाथ…..सारखे आठवत राहतात
तुला पाहिलेले आनंदी क्षण…..
तू कधी दिसशील पुन्हा
आतुरतेने उतावीळ होते मन……तू समोर आली की
शब्दही निशब्द होतात
डोळे तुलाच पाहत राहतात
आणि मनात साठवून घेतात……दोघेही आपण कायम अबोल
सुरु आहे फक्त नजरेचा खेळ…..
तू जेव्हा समोर असतेस
ती जीवनातील सुंदर वेळ…..प्रेमं म्हणावे की आकर्षण
अशी मनात आहे व्यथा….
तुला काहीच माहित नाही
अशी आहे माझी प्रेमकथा…… |