Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

LOVE POEM MARATHI प्रेम कविता

41

#प्रेम कविता तुझ्या रुपाची मोहिनी
निसर्गाचे सारे रंग
भरलेत तुझ्यात देवाने,
मोहिनी घातली माझ्यावरती
तुझ्या सुंदर रूपाने ।।चंद्रापरि मुख तुझे हे
नक्षत्रापरि रूप दिसे,
नाजुक नाजुक ओठांमधुनी
जणू लाल गुलाब फुले,
तृप्त झाले नयन माझे.
मात्र तुझ्या दर्शनाने,
मोहिनी घातली माझ्यावरती
तुझ्या सुंदर रूपाने ।।मोकळे केस भिरभिरती
अल्लड, अवखळ नदीप्रमाणे,
पाणीदार डोळे तुझे हे
जणू सरोजातील कमळ फुले,
घायाळ झालो पुरता मी
मात्र तुझ्या कटाक्षाने,
मोहिनी घातली माझ्यावरती
तुझ्या सुंदर रूपाने ।।हसताना तुझ्या ओठांमधुनी
शुभ मोत्यांची माळ दिसे,
बोलताना वाणीमधुनी
कोकिळेचा स्वर उमटे,
वसंतापरि बहर आला.
आयुष्यात तुझ्या येण्याने,
मोहिनी घातली माझ्यावरती
तुझ्या सुंदर रूपाने।।

42

#प्रेम कविता प्रेम म्हणजे असं असतं,
श्वास तुझा प्राण माझा,
नजर तुझी दृष्टी माझी,
साथ तुझी आधार माझा,
सुख तुझं आनंद माझा,
दुःख तुझं अश्रू माझे,
ओढ तुझी प्रीत माझी,
हाक तुझी साद माझी,
प्रेम म्हणजे नक्की काय असतं,
हे तुला भेटून समजलं,
माझे जीवनच बदलून गेलं,
जिथे तुझं माझं काहीच नसतं,
जे काही आहे ते आपलं असतं,
हेच कदाचित प्रेम असतं….
हेच कदाचित प्रेम असतं….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *