Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

43

थकली जरी पाऊले माझी,
“मी”थकणार नाही…
शोध “तुझा”घेता,
“मी”थांबणार नाही…

44

“बावरी”मी तुझी, जाहले
“फिदा”तुझ्यावरी…
सावरे रे तू मला…
नाही भरवसा आता,
माझाच माझ्यावरी….

45

“साथ तुझी”…
तळपत्या उन्हात, सावली म्हणून, “साथ तुझी”हवी आहे…
कोऱ्या पानावर उधळणारा, रंग म्हणून, “साथ तुझी”हवी आहे…
दुःखात असताना, सुखाचा क्षण म्हणून, “साथ तुझी”हवी आहे…
अज्ञात वळणावर, ओळख म्हणून “साथ तुझी”हवी आहे…
आयुष्याच्या प्रवासात, सखासोबती म्हणून, “साथ तुझी”हवी आहे…”
सरते शेवटी थकलेल्या जीवाचा उरलेला श्वास म्हणून
साथ तुझी”हवी आहे…

 

PREM KAVITA MARATHI | प्रेम कविता मराठी मध्ये.

46

किती प्रेम आहे हे
सांगता येणार नाही…
राग आला जरी तुझ्यावर
रागवता येणार नाही…किती खेद व्यक्त केलं तरी
मन मोकळं होत नाही…
काही केल्या आठवणींशीवाय
दिवस माझा सरत नाही…तुझ्याविना दुसरं काही
मला सुचत नाही…
कारण आयुष्यात माझ्या
बाकी काहीच उरत नाही…तुझ्याविना जगणं
कल्पनाही करवत नाही….
तुझ्याशिवाय माझं
अस्तित्व ही दिसत नाही….वचन दे तू मला कधी
सोडून जाणार नाही…
माझ्या मनाला कधी
ठेस लागू देणार नाही…

47

“तू”
“तू”माझ्या मनात आहेस,
“तू”माझ्या श्वासात आहेस…
“तू”माझ्या ध्यानात आहेस,
“तू”माझ्या स्वप्नात ही आहेस…
अन् शेवटपर्यंत “तू”माझाच
राहणार आहेस…
कारण “तू”फक्त माझा आहेस…
आणि मीतुझी…

Leave a Comment