48
मन माझं “पाखरू”… मन माझं पाखरू उंच भरारी घेत असते…जुन्या त्या वाटेवरती तुझ्याच आठवणीत रमते…आशेचे पंख घेऊनी मग तुझ्याच दिशेने वळते…फिरत बसतं गोठलेल्या त्या क्षणांच्या उंबरठयावरती…भिरभिरतं इकडे तिकडे पण कुठेच दिसत नसते…तुझ्याच पावलांचे ठसे अवती भोवती शोधत असते….इवलसं तळ मनाचा प्रेमाने तू भरून जा…. आठवणी काही तुझ्या दवबिंदू होऊन तू रीत ओंजळ माझं दुःखी मनाला कणभर अपूर्ण मी तुझ्याविना अन् जाता जाता तुझ्यासवे |
49
झेलत असते दुःखाचे चटके कोणाला काही बोलत नसते ……सत्यात जगण्याची धडपड तिची कल्पनेपरी काही उरत नसते…नशिबी तिच्या सतत झुरणे…. अन् स्वप्नांच्या पलीकडे राहून जगणं…झेप गगनाची पाहत असते इच्छेला मान कोणीच देत नसतो…हवं स्वतंत्र पाखरांसारखं तरी पंख ती कोणाला मागत नसते …आज उद्या म्हणत आयुष्य तीच सरत असते अन् निघून गेला काळ म्हणून स्वतःहास मग समजवित असते…. |
प्रेम कविता मराठी मध्ये.
50
झुरते मी तुझ्याचसाठी हे तुला कधी कळेल का ? माझ्या मनातून तुझ्या आठवणींचं पान कधी गळेल का…?मनात वसलेली भावना कधी समजून घेशील का…? व्यथा माझ्या मनाच्या तुझ्या हृदयापर्यंत कधी पोहचेल का…?ऐकून मनाची हाक तू माझ्यासाठी परतशील का…? जीव आहेस तू माझा म्हणून जवळ कधी घेशील का…?आहे मी सोबतचं तुझ्या म्हणून धीर तू देशील का…? पुन्हा एकदा नव्याने मला तू भेटशील का…?किती आहे तळमळ मनात कधी जाणून घेशील का…? विस्कटलेल्या स्वप्नाना पुन्हा सजवशील का..?हातात हात गुंफून मला रोखून ठेवशील का…? अखेरच्या श्वासापर्यंत तू साथ मला देशील का…? |