“भास”तुझा होताना…
भास तुझा होताना
चेहरा तुझा येतो डोळ्यांसमोर
अलगद येऊन बसते
स्मित ओठांवर…भास तुझा होताना
आस लागते भेटण्याची
मनाला माझ्या ओढ लागते
तुला पाहण्याची….भास तुझा होताना
प्रीत मनी उमलून येते.
कावर बावर होत स्वतःच
मनाला सावरते….भास तुझा होताना
डोळ्यांत प्रतिबिंब
तुझाच दिसतो
जणू काय चोहीकडे
तूच तू भासतो…भास तुझा होताना
हळुवार स्पर्श केल्यासारख वाटतो
जणू अलगद येऊन केस माझे
कुरवाळल्या सारखं वाटतो…भास तुझा होताना
आरश्यात पाहुनी .
हलकेसे मी लाजते….जणू तू आरश्यातुन बघतोय
असा वावरते… |