वेदनेचा ठाव सर्वांनाच असतो…. घाव किती खोल आहे हे मात्र… “स्वतः शिवाय”कोणाला माहीत नसतो…
62
दुःख देणारे खूप आहेत हसवणारा कोणी भेटत नाही… भेटले जरी साथी इथे शेवट पर्यंत कोणी थांबत नाही…
63
ऑनलाईन … साद प्रतिसाद जुळत गेले…. भेटणं कधी झालंच नाही… जीव जीवात गुंतून राहिले… विसरण कधी जमलंच नाही…
64
आयुष्याची धावपळ कधी थांबत नाही.. विचारांचा काहूर साथ सोडत नाही….मनाची व्यथा शांत राहू देत नाहीत… आठवणींचा पसारा सांभाळता सांभाळत नाही….अपेक्षा मनाच्या पूर्ण होत नाहीत…… तरी जगण्याची आस कमी होत नाही…तू येणार का…? माहित नाही ……. वाट पाहण्याची जुनी सवय अजून तरी जात नाही…..
Marathi Prem Kavita | प्रेम कविता
65
मैत्रीच्या पावसाने रंग प्रेमाची उधळली… चिंब होऊन भिजताना छटा मनावर उलटली.
66
प्रेम हे खेळणं होत आहे अर्थ व्यर्थ बनत आहेत….. भावनांचा खून करून लोक मन रंगवत आहेत आधी वाट दाखवून मग वाट चुकवत आहेत… हा कलयुगाचा खेळ आहे की मनाचा आरसा आहे ?.. कळतच नाही प्रेम वरदान आहे की अंधारात दिलेला श्राप आहे ?…
67
तू चंद्र. मी चांदणी… जवळ असूनी… “विरह”मनी…
68
किती झेलायचं, किती झुरायचं स्वतःला विसरून इतरांसाठी जगायचं, काही न बोलता मन मारायचं, स्वप्नांच्या पलीकडे राहून जगायचं, एक..”मुलगी”म्हणून अजुन, किती सोसायच..?