उखाणे मराठी नवरीचे | Ukhane Bride In Marathi

उखाणे मराठी नवरीचे

उखाणे मराठी नवरीचे, आज आम्ही पाहणार आहोत आजच्या पिढीला नक्की आवडेल असे. बेस्ट नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या उखाणे.

जे तुम्ही फॅमिली कार्यक्रमामध्ये घेऊ शकता ते सर्व उखाणे नव्या-जुन्या पिढीला आवडतील हे सर्व उखाणे मराठी मधून नावरीसाठी आहेत.

Ukhane Bride In Marathi नविन उखाणे मराठी नवरीचे सोपे उखाणे मराठी नवरीचे मराठी उखाणे नवरी साठी

1

सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या
साखळीवर .. चे नाव लिहिले मी
माझ्या हृदयाच्या पाकळीवर.

2

अबोलीच्या फुलांचा गंध
काही कळे ना ……चे नाव घेण्यास
शब्द काहि जुळेना.

3

विठोबा माझा विटेवरी उभा ………………..ने वाढवली घराची
शोभा.

4

हा दिवस आहे आमच्या करिता
खास …….ला देती गुलाब जामचा
घास.

5

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,
शोधूनही सापडणार नाही …. सारखा
हिरा.

6

निर्मळ मंदिर पवित्र मूर्ती माझं प्रेम
फक्त ..वरती.

7

इग्रंजी भाषेत आईला म्हणतात
मदर .. रावांचे नाव घेते सोडा माझा
पदर.

8

पुढे जाते वासरू मागून चाली गाय ……ला आवडते नेहमी दुधावरची साय.

9

कापला टोमॅटो कापला
कांदा
……ला पाहून झालाय
माझा वांदा.

10

पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले, त्यावर सोन्याच्या अंगठीने. ..चे नाव लिहिले.

11

भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले .
पळून … चे नाव घेतो जरा पहा
मागे वळून.

लग्नासाठी उखाणे मराठी नवरीचे

12

जाईच्या वेलीला आलाय बहार,
……ना घातला २७ फेब्रुवारीला
हार.

13

चांदीच्या आसनावर सोन्याचा गणपती,
चांदीच्या मखराजवळ चांदीचा हत्ती,
सजावटीने सगळ्या सजल्या भिंती, अभिमानाने सांगते …….. राव माझे पती.

14

श्रावणात निसर्ग होतो हिरवागार, ……रावांच्या नावाने घातला मंगळसुत्राचा हार.

15

नागपंचमी दिवशी केला साखरभात, ……रावांचे नाव घेते .ची नात.

16

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी आयुष्यभर सोबत राहो माझी व . ची जोडी.

17

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची
वाटी …….रावांचे नाव घेते सात
जन्मासाठी.

18

पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते
चाहूल …..रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल

19

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात …..रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

20

काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात गळ्यातून …..चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.

Ukhane Bride In Marathi

21

जन्म दिला मातेने पालन केले
पित्याने . च्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो प्रेमाने.

22

भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी ……. ची आणि माझी लाखात एक जोडी.

23

कल झालं आमचं लग्न लग्नात आला होता बॅड लावा, ..चे नाव घेतो मै जुकेगा नाही साला

24

कल झालं आमचं लग्न,
लग्नात आला होता बॅड,
..चे नाव घेतो मै जुकेगा नाही
साला

25

सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी …..रावांचे नाव घेते सात जन्मासाठी

26

लग्नाच्या पत्रिकेवर चित्र काढले श्री गणेशाचे आणी हातावरच्या मेहदीवर नाव लिहले ….रावांचे.

27

इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर
…नाव घेते … ची सिस्टर.

28

लहान मुले म्हणजे, देवाघरची फुल, …रावांची इच्छा आहे, होऊदेत जुळी मुल.

29

जेवताना ताटात, वाढते मीठ, ..रावांचे नाव घेते, संसार
करेन मी नीट.

30

मंदिरात वाहाते फुल आणि पान …. रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान.

नविन उखाणे मराठी नवरीचे

31

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस …. राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

32

गणपतीच्या मंदिरात संगीताची गोडी सुखी ठेव गजानना ..आणि माझी ही जोडी.

33

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी, ….चे नाव घेते / घेतो तुमच्या आग्रहासाठी.

34

उंबरठ्यावर पाय दिल्यावर लागली सुखी जीवनाची चाहूल …रावांचे नांव घेऊन टाकते दिल्याघरी पाऊल.

35

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल ….. रावांची जीवनात टाकले मी पाहून.

36

आई ने केले संस्कार, बाबांनी केले
सक्षम
.. ..सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

37

फुल उमलेल मोहरुन येईल सुगंध, ….. च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.

38

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी. …..रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.

39

नाच रे मोरा आंब्याच्या वनात, …. राव भरले माझ्या मनात.

40

दस-याला महत्व असते अपठयाच्या पानाचे, …रावांसारखे पति मिळाले पुण्य पूर्वजन्माचे.

सोपे उखाणे मराठी नवरीचे

41

स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी,
..रावांचे नाव घेते मंगळागौरीच्यावेळी.

42

छान छान बांगडया छुम छुम पैजन, …रावांचे नाव घेते ऐका सारेजण

43

सासरे आहेत प्रेमळ सासूबाई आहेत
दयाळू …रावांचे नाव घेते आहेत खूप
मायाळू.

44

चंदेरी समुद्रात रुपेरी लाटा, ……. च्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

45

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,
गुवाच नाव मी घेईल तुमचा काय
फायदा.

46

लग्न पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …… रावांच्या घशात अडकला घास.

47

लावलय माथ्याला कुंकू गळ्यात घातलंय
डोरलं,
…रावांचं नाव मी मनात माझ्या कोरलं

48

सासुरचे निराजन माहेरची
फुलवात ….. रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

49

अंगणातील झाडाला बहरली
पाने फुले ….च नाव घेतल्यावर चेहरा माझा
खुले.

50

लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा .
पूल….. चा हस-या चेह-याने घातली मला
भूल.

मराठी उखाणे नवरी साठी

51

पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी,
घालतात त्यात गुळ,
…रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ,

52

आई वडिलांसारखी माया, नसते कोणाला, …….रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला.

53

दोन जीवांचे मीलन जणू
शतजन्माच्या गाठी, …रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी.

54

टपरी वरच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव ‘टपरी वरच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव अन् आमच्या रावांची बाहेर किती लफडी ते विचारू
नका राव.

55

जीवनाच्या वेलीवर प्रेमाच फुल कधी उमलले हे कळलंच नाही …… रावांची मी कधी झाले हे
समजलंच नाही.

 

नाचत् नाचत् वाजत-गाजत आली -आमची वरात .. रावांचे नाव घेते. …..च्या दारात.

56

माहेरी साठवले मायेचे मोती. …..चे नाव घेऊन जोडते नवी नाती

57

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत
Complementary …….रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन
Entry.

58

MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा, लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे
घेऊ रे माकडा.

59

समोर सगळे असले कि बसतात सरळ, ……. रावांना लागते मी सारखी जवळ.

60

Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी …….ला लागली ५०००० ची लॉटरी.

61

प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व टेस्ट….रावांच नाव कस घ्यायच. ते आहेतच एकदम बेस्ट.

62

घड्याळात वाजले दहा ….. राव म्हणतात माझ्याकडे एकदा तरी पहा.

 

Leave a Comment