खर्या प्रेमाचे दुसरे नाव असे आहे “आई “जी केवळ एक आईच असू शकते. (Aai Kavita In Marathi) जेव्हापासून तिच्या आपण गर्भात आलो, त्यांनतर आपण जन्माला येतो आणि या जगात पदार्पण करतो आणि आयुष्यभर त्याच्याबरोबर राहतो. ती आपल्याला प्रेम आणि काळजी देते. देवकडून मिळालेल्या आशीर्वादासारखं आईपेक्षा मौल्यवान काहीही नाही, म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. तीच ती आहे जी आपल्याला जन्म देते आणि घराचे गोड घरात रूपांतर करते. आज आपण हिते पाहणार आहोत AaiKavita In Marathi, AAI KAVITA, Majhi aai kavita, aai kavita in marathi lyrics, आई कविता मराठी, आई कविता संग्रह मराठी.
आई कविता मराठी | आई कविता संग्रह मराठी Aai Kavita In Marathi, | Marathi Kavita Aai
1
आई असते हास्य नेहमी तीच्या मूखी, राबते ती दिवसरात्र ठेवित सगळ्यांना सूखी; आहे ती प्रत्येकाची पहिली गुरु आणि सखी, तिच्या शिवाय जगात नाही कोणी सुखी !!
दुसऱ्याचे हितगुज हेच तिच्या ध्यानी, प्रेमाचा मोठा साठा असतो तिच्या मनी; चांगल्या संस्कारांची आहे ती ज्ञानी, तिच आहे खरी जगत जननी !
चूका झाल्यास लावते ती चापटी, कारण यशस्वी बनवण्यासाठी असते ती खटापटी; तिच्या या निस्वार्थ मायेला नसते कधीच सुट्टी, म्हणून किमान दररोज द्यावी तीला एक प्रेमाची मिठ्ठी !!
2
औषध ने काही नाही झालं तर ती नजर काढते ती आई आहे हार कुठे मानते !!!
3
आई नावातच आहे आत्मा अन ईश्वर हिच्यातच दिसतो मला माझा परमेश्वर…. आई म्हणजे प्रत्येक घराचं मांगल्य माझं ह्या जगी असलेलं अस्तित्व….
4
आई तुझ्या नजरेत पाहताना, तुला एकटक पहावस वाटतं. तुझ्या त्या कोमल नजरेत, स्वतःला समावून घ्यावास वाटतं.
प्रेम खरच किती सुंदर कल्पना असतेंना, त्या नजरेने तुला नेहमी पहावसं वाटतं.
तुझ्यासाठी हे आयुष्य पून्हा पुन्हा जगावसं वाटत.
5
आई, तू कवितेचं अधीर पदार्पण, अन् माझ्या शब्दांची निवृत्ती, तू गवसलेलं प्रगल्भ अवधान, मी तुझी अवखळ आवृत्ती!
6
जी जवळ नसताना देखील जिच्या प्रेमाची उब तेवढीच जास्त जाणवते ती आई असते!
जी नजरे आड असून ही जिच्या डोळ्यातली काळजी इथूनही स्पष्ट दिसते ती आई असते!
जी हजारो मैलांवर असूनही जिच्या आवाजमधलं प्रेम तेवढंच प्रखर ऐकू येते ती आई असते
जी आज समोर हसताना जिच्या डोळ्यात काळजीने पाणी दाटून येते तो आई असते ।।
सार काही अवघड दिसत असताना जी पाठी असल्याने सारे सोपे होत जाते ती आई असते!
AAI KAVITA IN MARATHI | आई कविता
7
प्राजक्ताच्या फुलाची दाट पडते सावली मला जन्म देणारी धन्य ती माऊली
8
सुखाचे सागर माझ्या रूदई दाटले आई तुझे प्रेम माझ्या अंतरी साठले ॥१!!
तुझी कुस उसळून वर आली घरात सुंदर अशी लक्षुमी आली जशी देवीच नवसाला पावली!!२!!
लहानच चे मोठे केलेस तू संस्कार चांगले दिलेस तू मुलांना चागले घडवलेस तू!!३!!
किती आले जरी संकट धीर मात्र देतेस मुलांच्या सुखासाठी त्रास तू करून घेतेस ॥४!!
मनी नको अहंकार कुटला, आई होईन मी लीन तुजला. विपुल आशीर्वाद दे, आई तू मजला !!५!!
नको पैसा नको गाडी बंगला तुझे प्रेम सदा रहो आपल्या मुला!!६!!
सुखाचे सागर माझ्या रुदई दाटले आई तुझे प्रेम माझ्या आंतरी साठले!!७!!!
9
मन आहे माझ थोड़ हळव सतत भावनांमधे गुंतणार दुःखाने भरलय मन माझ आई पण तुझच सुख पाहणार
मन आहे माझ थोड़ विचित्र सतत विचारात गुरफटणार अपेक्षा न बाळगता आई सतत तुझ्या मदतीला धावणार
मन आहे माझ थोड़ वेड़ फक्त तुझ्यासाठीच धड़धड़णार तुझ्या चेहऱ्यावरच हास्य टिकवण्यासाठी धडपडणार.
मन आहे माझ थोड़ अस्वस्थ सतत तुझ्याच चिंतेत असणार येणाऱ्या प्रत्येक संकटांना आई तुझ्यासोबत सामोर जाणार
मन आहे माझ थोड़ चंचल खुप सारे प्रश्न विचारणार तुझ्या प्रत्येक उत्तरात आई माझ्यावरील प्रेम शोधणार
मन आहे माझ प्रेमळ तुझ्यावर खुप प्रेम करणार आयुष्याच्या पाऊलवाटी आई तुला कायम साथ देणार.
AAI KAVITA IN MARATHI | आई कविता
10
आई (आजी) तुझ्या पदराआड लपून कितीतरी गोष्टी मी हट्टाने ऐकल्या होत्या, तुझ्या पोटाच्या उबेने त्यातल्या कित्येक मी झोपल्या नंतर संपल्या होत्या…
एवढी मायेची ऊब सांग ना ग आई मला कुठे मिळणार होती? तुझ्या माडीवर डोकं असतांना मला कोणती गादी लागणार होती..
तुला एवढ कसं नेहमी माझं कौतुक असायचं चार मानस घरी जमल्यानंतर तुझ्या तोडुन ते यायचं.. इतकी कशी माया तू मला लहानपणापासून लावली पंढरीची विठाई तुझ्या मधली मला तू गेल्यावर गावली…
तू असताना मला तू कधी कळालीच नाहीं तुझ्या पायची धूळ माझ्या मस्तकी कधी लागली नाही
माझ्या प्रत्येक यशामध्ये तू नेहमीच हातभार लावला जमेल तसं तू तुझ्या देवाला कौल माझ्यासाठी लावलं..
आता तू नसताना तुझ मोल किती होतं ते मला कळतंय तुझ्यासाठी काहीच न केल्याच दुःख मनामध्ये सलतय..
11
येत नाही जास्त आठवण हल्ली तुझ्यापासून दूर मी आहेच कुठं
#आई❤️
MAJHI AAI KAVITA आई कविता मराठी मध्ये
12
ती आई आहे.. स्वतः सोसुन मरणयातना आपल्याला जन्म देते ..किती उदार तिचं मन.. सारं जगचं देते.. जगायला.. बक्षिस म्हणुन. हा निसर्ग.. ही फुलं हे प्रेम ही
गाणी ही कविता सारं तिच्या पासुन सुरु होतं.. आणि तिच्या पाशीच थांबतं.. ती जननी आहे..
तीनचं सुरु करून दिली जन्मयात्रा.. बघायला डोळे, एकायला कान..सारी माऊलीकृपा.. ती देवाला मानतेचं पण देवही तीला मानतो..”ती माऊली आहे..
देणारी बात स्वत: जळुन प्रकाश सगळी दुःख पचवुन मायेचा फिरणारा हात. सगळ्यांच सगळं करुन सवरुन ममतेची पहाट म्हणजे ती जन्मदात्री आहे..
संकटं ही शरण जातात तिच्या चरणांशी तीचा जीव सारा आपल्या पिलांपाशी.. सर्वाना खाऊ घालेलं स्वतः राहुन ऊपाशी.. ती माय आहे..
हा शब्द जोडला गेला की च मुळी महात्म्य येतं सितामाई, रमाई, धरतीमाय, पृथ्वीमाय…
मायेची खळखळुन वाहणारी जान्हवी आहे ती.. अशी थोर जगन्माता आहे ती… जनावर असो माणुस, अबोल
वृक्षवल्ली सुद्धा आईपण असतचं सवरत डवरत..शहारतं.. बोलतही असतं जगतही असतं भरभरून प्रत्येक आईतुन..
आईच्या धमन्यातुन.. अशी ती जन्मदा आहे. ती आपल्या लेकराला ठेच लागली की तिच्या डोळ्यात पाणी
येत.. न सांगता कळतचं सार मनातलं… शेवटी काहीही झालं तरी माऊली आहे लेकराचा वार स्वतःच्या अंगावर घेणारी रणरागिणी.. आहे
ती.. काहीही झालं अगदी काहीही.. तरी आई आहे ती आई… वात्सल्यसिंधु आई..
13
“ती सकाळी सर्वांच्या आधी उठते ती सर्वांची काळजी घेत असते ती संपूर्ण घर तिच्या प्रेमाने बांधून ठेवते तिच्यामुळे घराला घरपण असते तिला मात्र कधीच सुट्टी नसते” #माझी आई
14
“आई”…. तुझ्या कुशीत शिरूनी, पुन्हा एकदा मला “लहान”व्हावंसं वाटतंय… तुझ्या प्रेमाच्या सावलीत खेळूनी, मला पुन्हा “निश्चिंत”झोपवंस वाटतंय…
आई कविता मराठी | आई कविता संग्रह मराठी | MOTHER POEMS MARATHI
15
आई … तुझ्या ममतेला तोड नाही….. डोळ्यासमोरचे कष्ट कधी कळू दिलं नाही फाटक्या संसाराला कधी नाव ठेवली नाही…..
यातना सोसाव्या लागल्या तरी दुःख मानली नाही सुख मिळत नाही म्हणून कधी कोणाशी भांडली नाही…. डोक्यावर छप्पर नसला तरी हिम्मत सोडली नाही
पोटच्या पोराला मायेची सावली कमी पडू दिलं नाही….
दिवसरात्र मेहनत करून पोरांसाठी झिजत राहिली अपमानित होऊन ही ममतेपरी जगत राहिली…
डोळ्यामधील अश्रू आवरत अंगाई गीत गायली पहिली घास भरवून पाहिलं पाऊल सावरली…
आयुष्याच्या प्रवासात अनेक ओझे झेलली… अडखळलेल्या आयुष्याला शेवटी वळण तिनेच दिली…
खरच, तुझ्या मायेला शब्दांत मांडता येत नाही आई… तुझ्या ममतेला तोड कोणाचीच नाही….
16
आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे. देवाला सर्व ठिकाणी पोहचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली असावी… आपली रोज सुरुवात ही आई शब्दापासून होते आणि रात्रीचा शेवट पण
आई या शब्दापासून चं… आई बद्दल जेवढं लिहु तेवढं कमी चं एक वेळ पेन ची शाही संपेल पण आई ची महती कधीच संपु शकत नाही…
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या ह्दयी, तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी “आई”…
कृपया :तुम्हाला Aai Kavita In Marathi, AAI KAVITA, Majhi aai kavita, aai kavita in marathi lyrics, आई कविता मराठी, आई कविता संग्रह मराठी, Mother Kavita marathi आवडल्यास जरूर share करा. Motivational Marathi