Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

कोणीही सांगितलं नव्हत, ( Marathi Prem Kavita ) पण आमच्या लहानपणी आम्हाला माहित होते की कवितांमध्ये प्रेम आणि प्रेमाला कविता खूप महत्वाच्या आहेत.
शुद्धीवर आल्यानंतर आम्ही लिहिलेली पहिली कविता म्हणजे अर्धवट प्रेमकविता. कदाचित साहित्याचा सर्वात लाडका विषय म्हणजे प्रेम. आज आपण हिते पाहणार आहोत 90 + Marathi Prem Kavita, Marathi prem kavita tyachyasathi. marathi prem kavita for boyfriend, marathi prem kavita for girlfriend,Marathi Prem Kavita Charolya.

Marathi Prem Kavita
Marathi Prem Kavita

Marathi Prem Kavita | प्रेम कविता इन मराठी

1

# प्रेम कविता

तुझाच स्पर्श नेहमी हवासा
वाटतो
तुझ्याच श्वासात नेहमी
रहावस वाटत
स्वप्नात का होईना तुझ्याच
सोबत रहावस वाटत
आयुष्य आहेस तू माझ
तुझ्याच मिठीत जगावस
वाटत

2

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..
वाटली तर मैत्री..
घेतली तर काळजी.. तुटले तर नशीब..
पण मिळाले तर
स्वर्ग.. ..प्रेम कविता

3

# प्रेम कविता
प्रेम मागून मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं …….
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं………
माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही.
करू म्हटल्याने असं काही
होत नाही….
त्यासाठी जुळावे लागतात
उभयतांचे धागे…..
भीड आणि भीती मग
आपोआप घडते मागे …..
प्रेमाचे फुलपाखरू स्वछंदी
उडते
मनमोही रंगानी पुरतं वेडं
करत
पण त्यामागे धावलं तर, .
आणखी पुढे पळतं…
डोळे मिटून शांत बसलं कि
हळूच खांद्यावर बसतं.
आपण प्रेमात आहोत
याची जाणीव करून
देतं……..

4

# प्रेम कविता
तुझ्याचं प्रेमाने शिकवलें
आहे
तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय….
तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय
आयुष्यात पडता पडता
सावरायला…
तुझ्याचं प्रेमाने शिकवलंय
रडता रडता हसायला…
तुझ्याचं प्रेमानं शिकवलं
त्या सर्व गोड आठवणी
जपायला
तुझ्याचं प्रेमानं शिकवलंय
आयुष्यभर साथ द्यायला
पण आज……
आज तुझ्याचं प्रेमाच्या
विरहाने
डोळ्यातून अनं हृदयातून
वाहतंय अखंड
पाणी

5

कस असत ना आपण
एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो
तिच्या सहवासात वावरतो
त्या व्यक्ती सोबत प्रत्येक
क्षणाचा आनंद घेतो पण
तीच व्यक्ती जेव्हा आपणास
सोडून जाते आपल्या
जीवनातून निघून जाते तेव्हा
खुप वाईट वाटत……….. कारण
आपल्याला त्या व्यक्ती ची
सवय झालेली असते तिच्या
सहवासात राहण्याची आणि
तीच व्यक्ति जेव्हा सोडून
जाते तेव्हा उरतो तो फ़क्त
एकांत आणि तिच्या
आठवणीत आपण खुप खुप
रडतो एकट्याची सुरुवात
शेवटी एकटाच
# प्रेम कविता

 

Love Poem Marathi लव्ह पोएम मराठी

6

# प्रेम कविता काय आहे
तिच्यात अस मी नेहमी
तीला बगितल्या तिच्यात
हरवून जातो.
तिच्या फोटो बगितल्या वर
मी एका
वेगळया आनंदाच्या दुनियात जातो.
खुप बोलावस वाटते तिचा
सोबत
पण बोलायला गेलो तर मी
परत तिच्यात हरवून जातो.
ती online नसताना
मन विचलित होत
मग परत परत तीच्या dp
बगन्यात
कळत नाही टाइम कुट
निगुण जातो.

7

#प्रेम कविता
पावसाचा थेंब खुप छोटा *
असतो…….
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो……
असाच एक एसएमएस
खुप छोटा असतो……
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो……

8

लिहतो आहे कविता फक्त
तुझ्यासाठी..
वेडा प्रेमी झालो फक्त
तुझ्यासाठी..
आणखी कुणाला नाही
बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन
माझे फक्त
तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझी आठवण
काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत
फक्त तुझ्यासाठी..
सर्वान पेक्षा मला तु खुपचं
जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते फक्त
आणि फक्त तुझ्यासाठी
# प्रेम कविता

9

वेड मन हरवलय माझे तुझ्या प्रेमात,
त्याला समजवू तरी कसे?
मैत्री बदलते रे प्रेमात
पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ
तरी कसे..
#प्रेम कविता

10

धुंद धुंद ही हवा
मंद मंद गारवा
तोच रंग हिरवा
मागतो सखी तुवा
तेच शब्द लाघवी
आज आण अधरी
तीच मौन संमती
येवू देत लाजरी
आस तुझी लागता
स्पंद होय कापरा
स्मित आणि स्मरता
जीव होय बावरा
स्वप्न गीत गावुनी
अर्थ देई जीवनी
आज मी तुझा ऋणी
स्पर्श गंध जागवुनी
#प्रेम कविता

 

Marathi Prem Kavita For Wife ( मराठी प्रेम कविता )

11

प्रेम कविता बायको
धागा रेशीम बंधाचा
आधार घर धन्याचा
पान्हा तान्हया लेकरचा
सागर प्रेम वात्सल्याचा
श्वास जोडीदाराच्या प्रेमाचा
पदर मायेच्या उबेचा
पाय गृह लक्ष्मीचा
ताळेबंध संसाराचा
ओढा वाहणाऱ्या प्रेमाचा
घास खरपूस भाकरीचा
नाजूक तुकडा काळजाचा
खंबीर साथीदार सहजीवनाचा

12

# प्रेम कविता

कधी कधी वाटते,
एका अशा ठिकाणी जावे,
“तो आणि मी
“सोबत दुसरे कुणीही नसावे,

वळण-वळणाची ती वाट असावी
हिरव्या-गर्द झाडांनी जी डुंबून
जावी,

लाल मातीचा गंध असावा,
धुंद गंधाने त्याच्या
हवेत गारवा घुमावा,

हवेच्या नाजूक झुळकीने
मनाला माझ्या भेदून जावे,
स्पर्शाने तिच्या मग
हे देह अगदी रोमांचित व्हावे,
धुंद अशा त्या क्षणी
भाव-भावनांचे काहूर माजावे,
आणि मधुर मिठीत त्याच्या
माझे सर्व विश्व एकरूप व्हावे,

13

स्वप्नात रोज आजकल, येते कोणी अशी
काय सांगू ती परी दिसते तरी कशी ?
मोत्यांसारख्या नजरेने तिने वळून काय पाहिले
मन माझे त्याच क्षणी तिच्या प्रेमात

14

#प्रेम कविता
प्रेमाच्या पाऊसधारा…….
क्षणात येता पाऊसधारा,
गडगडले मेघ अंतरी…
प्रेमवर्षा बरसवण्या,
आसुसले मन तुझ्यावरी …
खिळल्या नजरेत नजरा,
नि:शब्द ओठ जरी,
हिरमुसलेला अल्लड वारा,
प्रीत आपली सावरी,
प्रेमसागर खळाळणारा,
भावनांचे मनात मंथन….
स्पर्श तुझा भिजवणारा,
तुझ्या बाहूंचे बंधन…..
थेंब ओघळणारा,
माझ्या गालावरी,
ओठाने तुझ्या टिपून घेता,
आला शहारा अंगावरी….
प्रेम घन ओथंबणारा,
बरसू दे माझ्यावरी….
हृदयात मज
विसावू दे निरंतरी….

15

प्रेम कविता
खळखळणारे हास्य तुझे
मनात मी साठवून घेतो
अन अश्रू तुझ्या नकळत
मी सदैव टिपून घेतो….
गालावरची खेळी तुझी
हेच माझे विश्व आहे
गुंफलेले हात आपले
हेच चिरंतन सत्य आहे……
विरहाचा कापरा वारा
सदा मला त्रस्त करतो
बरसणाऱ्या पावसातही
तुझी आठवण घेऊन येतो….
शब्द हेच साधन असतं
एकमेकांच्या जवळ येण्याचं
मुका स्पर्शही बोलून जातो
निमित्त फक्त कोसळणाऱ्या
पावसाचं

 

Love Poem Marathi लव्ह प्रेम कविता

16

तुमच्यासाठी काय पण
कस सांगु तुम्हाला तुम्ही
माझ्यासाठी काय
आहात
श्वासा शिवाय कदाचित मी काही
क्षण जगू शकेन
पण तुमच्याविना नाही
हो तुम्हीच पहिले आहात
की ज्यांना मी जिवापेक्षा जास्त
प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुमच्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे
मागत असत
माझी अवस्था त्या बिना पाण्या
शिवाय
तडफ़डना-या माशा सरखी झालिय
माहीत आहे तुम्ही येणार नाहीत
तरीही….
हे तारे तुटुन जातील, हा सूर्य
विझुन जाईल
पण आशेच्या शेवटच्या किरणा
पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची वाट
पाहतोय
मी तुमचीच वाट पाहतोय
#प्रेम कविता

17

#प्रेम कविता
भेटूया पुन्हा कधीतरी
कुठल्याशा अपुऱ्या कवितेच्या
ओळीत
अर्धवट राहिलेल्या अनवट सुरावटीत
भेटूया पुन्हा कधीतरी
माझ्या हृदयात तुझ्यासाठी
झुरझुरणाऱ्या झऱ्याकाठी
स्वप्नाच्या प्रदेशात अज्ञात तरुतळी
मग पडतील केशर उन्हाचे सडे
हळदुली शेतं मनात डोलायला
लागतील
निळेशार स्फटिक-झरे झुलझुलातील
सारेच कसे मंतरलेले होऊन जाईल
त्यावेळी तू आणि मी
दोन प्रेमी युवामाळी
हातात हात घेऊन बसू
तुझ्या भस्मी डोळ्यांना
मी माझे डोळे देईन
गुलाबी ओठांना ओठ देईन.

18

प्रेमाचा सुगंद
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज नवा रंग
रंग रांगात मी असे रंगुनी गेले
मी माझीच न राहता, न माझात उरले
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
#प्रेम कविता

19

तुला कधी माझं प्रेम अन् प्रेमाची
भाषा कळुच शकतं नाही।
तु तर स्वतःसाठी जगतं आलीस
दुसर्यासाठी कधी जगली नाही।
नक्कीच प्रेम कळेन तुला
मनापासून
एखाद्यावर प्रेम करुन बंघ।
स्वतः साठी तर संगळेच जगतात
गं दुसर्यासाठी थोडं जगुन बघं।
# प्रेम कविता

20

शोधु कुठे तुला
आलीस जीवनात मन फुलवुनी गेलीस
सावली बनुनी रुद्याला जिंकलीस
चांदणी पर्री चंद्राला चमकवलीस
शोधु कुठे तुला
एकट्या जीवाला प्रेमाचा तारा बनवलीस
लाजरी पणे मला ही लाजवलीस
मेलेल्या रोपट्याला का गं जगवलीस
शोधु कुठे तुला
प्रेम होते खरे की खोटे का नाही बोलीस
काटेरी वनात का गं सोडुन गेलीस
स्वप्नापरी तुही आज हरवलीस
शोधु कुठे तुला
टोचणारे काटे अजुनही सांगताहेत
इश्काच्या जखमा अजुनही आल्या आहेत
प्रेम अन् प्रेम महाग पडतय काळजास
शोधु कुठे तुला…. !
# प्रेम कविता

21

#प्रेम कविता तू आणि तुझं सर्व विश्व……
तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं ज्या क्षणी तुझ्या मध्ये मी स्वतःला सामावून घेतल होतं
तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता
तू आणि तुझी स्वप्न
“अगदी माझ्या डोळ्यात जगत होती ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात मी माझं आयुष्य फुलवत होती
तू आणि तुझा भास माझ्या जगण्याची दिशा बनली होती ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला, मी अंतर्मनाने भुलली होती

22

होशील का माझी
झुगारून बंधने अशी
देशील का साथ तुझी
वाटेवर जीवनाच्या माझी…राहशील का हृदयात अशी
मोती वसतो शिंपल्यात तशी
होशील का सावली माझी
पावलो पावली असते तशी…होशील का ओळख अशी
नावाने नातं ओळखतील तशी
होशील का स्पंदने अशी
काट्यांची घडीच्या असतात तशी
# प्रेम कविता

23

# प्रेम कविता
रीमझीम पावसाचा थेंब होवून
तुला भीजववास वाटत…
रात्रि काजवा होवून तुला झोपेत
पहावस वाटत…
सकाळी-सकाळी कोवल उन
होवून तुला उठ्वावस वाटत..
आणी ग्रीष्म रुतुची थंड हवा
होवून तुला स्पर्ष करावास
वाटत….

24

इच्छा आहे प्रिये तुला
मिळवण्याची, बाकी
कसलीच आशा नाही
ह्या प्रियकराची..”
तक्रार माझ्याकडे नाही
देवा कडे कर, काय जरुरत
होती तुला इतके सुंदर
बनविण्याची..
प्रेम हे फुल पाखरा सारखे
आहे जेव्हा तुम्ही त्याला
पकडायला जाता तेव्हा
तेदुसरी कडे उडून जाते,
पण जेव्हा तुम्ही शांत
असता तेव्हा ते हळूच
येते आणि तुम्हाला स्पर्श
करते, तेव्हा तुमचे होउन
जाते म्हणून वाट बघुयात
आपापल्या फुल पाखराची..
❤️❤️❤️❤️❤️
# प्रेम कविता

25

# प्रेम कविता
सवय…
आहे…?
तुझी वाट पहाण्याची,
तु येणार नसताना ही…?
सवय…
आहे…?
तुझ्याशी गप्पा मारण्याची,
तु ऐकत नसताना ही…?
सवय… आहे…?
तुला पहात बसण्याची,
तु समोर नसताना ही…?
सवय…
आहे…?
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची,
तो येणार नसताना ही…?
सवय…
आहे…?
मन मारून झोपण्याची,
झोप येणार नसताना ही…?
सवय…
आहे…?
अशा कित्येक सवयी,
सोबत घेउन जगण्याची,
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही…?

26

लोक म्हणतात कि मनाची जखम
बरी होण्यास
वेळ हेच औषध आहे
पण खरेतर वेळेपेक्षा प्रेम हे मनाची
जखम लवकर
भरून काढते
प्रेमाचे औषध घेऊन जर आपला
साथीदार जर
आपल्यासमोर असेल
तर मनाच्या जखम कशी टिकून
राहणार नाहीका.
#प्रेम कविता

27

मला वाटले होते कि प्रेम हे मनाचे मृगजळ
आहे आणि हि एक फक्त कल्पना आहे
जी बिलकुल अस्तित्वात नाहीये,
पण जेव्हापासून मी तुला पाहिले आहे
तेव्हा पासून मला प्रेम
जाणवायला लागले आहे, ते
मृगजळ नसून खरे आहे हे
कळायला लागले आहे,
एवढंच नव्हे तर
मला हेही कळाले आहे
कि प्रेम हे दुसरीकडे
तिसरीकडे कुठेही नसून
तुझ्या व माझ्या हृदयात
वास्तव्यास आहे
# प्रेम कविता

28

तू म्हणतेस कविताकर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही. डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र
तूच दिसते सर्व जागी अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत
नाही, तुझी आठवण आल्यावर
मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू, खुप
गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या
अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही
पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही.
खरच..
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही
#प्रेम कविता

29

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती
बरोबर
असता. तुम्ही त्याचाकडे
दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता, पण
जेव्हा ती खास
व्यक्ती तुमच्या जवळपास
नसते. तेव्हा तुमची नजर
त्यालाच शोधत असते.हो ना
# प्रेम कविता

30

# प्रेम कविता प्रेम
असावं निरपेक्ष,
आभाळासारखं निरभ्र
जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शुभ्र
मावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव
सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीव
सागरासारखा अथांग असावा विश्वास
दुसऱ्यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास
हातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण
अलगद हात हाती येतो सलते एक आठवण
मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती
अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

31

मनात तुझ्या नसतानाही
मागे वळून पाहशील का ?
तुझ्याचसाठी थांबलो इथे
दोन शब्द बोलशील का ?
पाहून पाहून दमलो मी
अखेरतू पाहशील का ?
कोंडल्या भावना वाट देशील का ?
स्वप्न पाही मन माझं
तुझंही असच होतं का ?
मनात तुझ्या नसतानाही
कबुल तू करशील का ? #

32

प्रेम कविता
तुझा चेहरा, मनाचा आरसा
निर्मळ, चंचल, अवखळसा
लकाकतो अंधारात जणू
पौर्णिमेचा चन्द्र जसा,
जगण्याशी तुझं नातं अतूट
हसणं, आनंदाची लयलूट,
त्यावर साज चढ़वितो
कुरळ्या केसांचा मुकुट.
पण उगाच बोलत नाहीत ते
शब्दांवर डोलत नाहीत ते,
तुझ्या दोन डोळ्यांचे डोह
कसा आवरावा तुझा मोह ?
मी गोफ शब्दांचे गुंफतो
मनाला शब्दांशी जुंपतो
पण सुटतच नाही तो
कसा आवरावा तुझा मोह ?

33

जेव्हा तुम्ही प्रेम करता,
तेव्हा तुम्ही दुखावले जाता
जेव्हा तुम्ही दुखावले जाता,
तेव्हा तुम्ही द्वेष करता
जेव्हा तुम्ही द्वेष करता,
…. तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता
जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता,…..
तेव्हा तुम्ही मिस करायला लागता
आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,
…. तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता
पुन्हा प्रेम करू लागता !!
प्रेम कविता

 

Marathi Prem Kavita | प्रेम कविता इन मराठी

34

कदाचित मी तो नाही ज्याचे
स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच
आहेस जिचे स्वप्न मी बघत
असतो
कदाचित मी तो नाही ज्याची
तू वाट बघतेस
पण ती तूच आहेस जिची मी
आतुरतने वाट बघत
असतो
कदाचित मी तो नाही
ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण ती तूच आहेस जिच्यावर
मी अगदी जीवापाड
प्रेम करतो
#प्रेम कविता

35

जीवनातल्या प्रत्येक
शब्दाना तुझी साथ हवी आहे,
माझ्या गीतानमधे तुझे सुर
हवे आहे,
माझ्या आश्रुना तुझा बाँध
हवा आहे,
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा
गंध हवा आहे,
या जीवनात आणखी काही
नको फक्त तूच हवी आहे.
# प्रेम कविता

36

एक क्षण तूझ्या सहवासात असलेला
एक क्षण तुझ्या विरहात असलेला
एक क्षण तुझ्या प्रतिक्षेत असलेला
एक क्षण तुझ्या आठवणीने फुललेला
एक क्षण तुझ्याबरोबर हसलेला
माझ्या मनात मात्र खोलवर ठासलेला
असा माझा एक क्षण तुझ्याचसाठी
जगलेला
जनु चंदनाप्रमाणे
# प्रेम कविता

37

वाट पाहशील तर आठवण
बनून येईन,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून मला
आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य
बनून येईन
# प्रेम कविता

38

तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार
स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण
होणारा हर्ष… तुझ्या आठवणी म्हणजे…
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी
म्हणजे… विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या
आठवणी म्हणजे… आयुष्य जगण्याची आशा
आणि तुझ्या आठवणी म्हणजे… गमवलेल्या
गोष्टींची निराशा तुझ्या आठवणी म्हणजे…
पावसात चिंब भिजणं तुझ्या आठवणी म्हणजे…
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं तुझ्या
आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे तुझ्या
आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग
आहे.
# प्रेम कविता

 

Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी

39

# प्रेम कविता
फक्त मिठीत घे…!!
फार काही नकोय रे तुझ्याकडून…
फक्त मिठीत घे…
एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभ राहिल्यावर..
फक्त मिठीत घे…
सगळी दुनिया विरोधात असल्यावर..
फक्त मिठीत घे…
जगण्याची लढाई लढताना खुप थकल्यावर..
फक्त मिठीत घे..
जगण्याची इच्छाच मरून गेल्यावर….
फक्त मिठीत घे…
मरणाच्या आधी दोन क्षण…
फक्त मिठीत घे…..
फार काही नकोय रे तुझ्याकडून…
फक्त मिठीत घे..
!!! फक्त मिठीत घे…!!!

40

प्रेम कविता इतकी का सुंदर दिसतेस तू..
मी विचारल्यावर हळूच
गालात का हसतेस तू
उघड कधीतरी हे रहस्य
हि कसली जादू केलीस तू…
तुझ्यातच माझं मन रमतं
तुझ्या सहवासातच ते हसत
तुझ्या पासन दूर जायला मन घाबरत
का समजून घेत नाहीस तू
इतकी का सुंदर दिसतेस तू…..
मनाच्या एका कोपऱ्यात सजवलंय ग तुला
माझ्या लेखणी ने कोन्या कागदावरती रंगवतोय तुला नवीन काही लिहायला घेतलं तर तुझा
हसरा चेहरा समोर येऊन जातो
इतकी का सुंदर दिसतेस तू………..
शब्दांच्या कोड्यांमधून निघून
तुझ्या स्वप्नांमध्ये रमून जातो
इतकी का सुंदर दिसतेस तू
ना कळत तुझ्यातच गुंतून जातो मी
इतकी का सुंदर दिसतेस तू……….
पावसाच्या सरीत भिजताना
खूप छान दिसतेस तू
बागेमधील फुलांकडे बघता
नजरेस पडते तू
तुझे रूप बघून गुलाबाच्या
फुलाला लाजायला येईल
इतकी का सुंदर दिसतेस तू……
डोळे बंद करताच येतेस समोर तू
डोळे बंद करताच समोरून जातेस तू
वचतुझं माझं नात नसतानाही
माझ्यासोबत असतेस तू……..
इतकी का सुंदर दिसतेस तू……

Leave a Comment