Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

51

दूर असले तरी,
मनाच्या अगदी जवळ राहतात …
मनात वसलेली माणसं..,
आठवणी कुठे सोडून जातात…?

52

कधी असेही घडावे…
कधी असेही घडावे
आठवण काढता क्षणी
समोर तू दिसावे…कधी असे ही घडावे
स्वप्नांच्या दुनियेतून
सत्यात तू उतरावं….कधी असे ही घडावे
हातात हात घेवून
चार पाऊल सोबतीने चालावे…कधी असेही घडावे
बोलके डोळे वाचून
प्रीत माझी स्वीकारावे…कधी असेही घडावे
मन भावना तुझ्यापर्यंत पोहचावे
अन् अलगद येऊन मला
मिठीत तू घ्यावे…

53

एक गुलाब
होकराच्या आशेने भेट दिले कोणी
प्रेमाच्या आठवणीने सांभाळून ठेवले कोणीदिवस संपताच विसरून गेले कोणी..
नकार ऐकताच पायदळी तुडवले कोणी…वेळेनुसार उपयोग केला जातो मला….
माझ्या मनाचा विचार केलाय का कोणी…?

54

प्रेमाच फुल
खुलत गेली…
धुंद वाऱ्यासंग
डुलत गेली…प्रितीच्या सावलीत
बहरत गेली…
विश्वासाच्या वेलिसंग
वाढत गेली…

55

प्रेम तुझा
धुंद गार वारा
कसं सावरु मी..?
आठवणींचा पसारा ….भरून येता
मनाचा गाभारा…
कसं आवरू मी..?
अश्रूंच्या धारा…

Leave a Comment