78
तू आहेस म्हणून तुझ्यावर विश्वास होता, तू आहेस म्हणून तुझ्यावर. “प्रेम”होतं, तू आहेस म्हणून तुझ्यावर रुसवा होता, तू आहेस म्हणून तुझ्यावर भावना होती, तू आहेस म्हणून, तुझा भास होता, पण आता तू तो राहिलाच नाहीस, “आणि तुझा भास”सुद्धा… |
प्रेम कविता इन मराठी
79
मनाला मनासारखं भेटत नसतं, भेटलं तरी जपावं लागतं,चेहरा भेटेल चेहऱ्यासारखं, मन भेटणार नाही मनासारखं,सर्वांचं मन सारखं नसतं, हे कधी विसरायचं नसतं,मनातील हितगुज सांगायचं नसतं, मनातच साठवून ठेवायच असतं,सारं जग असच जगत मनाची समजूत घालावं लागतं,मनाला मनासारखं भेटत नसतं, फक्त आस धरूनी जगावं लागतं…. |
80
प्रेम करणं सोपं असतं, पण विसरण त्याहुन अवघड असतं, प्रेम सर्वांना होत असतं, पण सर्वांचं सारखं नसतं, प्रेम न कळत होत असतं, पण सोडूनही संपत नसतं, प्रेम मनापासून केलेलं असतं, म्हणून मुळापर्यंत मिटवताही येत नसतं… कारण, प्रेम ते प्रेमच असतं. तुमचं माझं सगळ्यांच वेगळं असतं. |