प्रेम कविता इन मराठी
87
खूप दिवसांपासून खूप दिवसांपासून खूप नाराज बघतोय तुला, माहित नाही कुठल्या दुःखांना सोबती केलं आहेस तू , तुझं मोत्यांसारखं हसणं,तुझं माधुर्य,तुझा गोडवा, आता धूसर धूसर दिसतंय सगळं काही, प्रत्येक गोष्टी कडे निराश डोळ्यांनी पाहत आहेस तू, काय काय लपवशील किती किती बेचैन राहशील, स्वतः तुझ्या गुपितांचं स्वतःच कोडं बनली आहेस तू माझी उमेद जर मिटली आहे तर मिटू दे ना, उमेद काय गं हवेचं निष्कारण येणं जाणं एवढंच ना ? माझ्या इवल्याश्या आयुष्याच्या वटवृक्ष दुःखाचं, खरंच दुःख वाटून घेत बसू नकोस, आयुष्याचं दुखणं काय घेऊन बसलीयेस, एक एक श्वास पण दुःखांच्या श्वसनलिकेतून घेतो मी, तू तुझ्या असीम सौन्दर्याची तमा बाळग, निराशा काय गं ,थंड हवेला पडलेलं वादळाच स्वप्न आहे मी दुर्लक्षित होतोय तुझ्याकडून म्हणून मला कसलीच तक्रार नाहीये, माझं मरण म्हणजे माझ्या जिवंतपणीच श्रेय आहे मी ओळखून आहे तुला भीती वाटते जगाची, मी जाणून आहे कि जग किती अजब किती वेगळं आहे इथे जिंदगीच्या पडद्यांमध्ये मृत्यू सतत घोंगावत आहे , तुटलेल्या हृदयांची झंकार जणू वीणेचा आवाज आहे मला तुझ्या अलग होण्याचं दुःख नाहीये , माझ्या स्वप्नांच्या दुनियेत तुझं वास्तव्य कायम आहे आणि राहील, हे तू खूप छान केलंस ,म्हणालीस कि मला भेटू नकोस, पण ,मला एवढंच सांग कि तू उदास का आहेस ? नाराज राहू नकोस माझ्या आयुष्याच्या उसवलेल्या शिलाईवर, तुला माहितीये माझ्या आयुष्याची तू एक सुंदर शिवण आहेस, माझं काही नाही मी रडत कढत जगेल असंच, पण माझ्यासाठी तू उदास राहू नकोस, झालंय तरी काय असं,जगाने तुला विलग केलंय माझ्यापासून, पण विचार कर कोण झालंय इथे कुणाचा तुला शपथ आहे माझ्या अर्थहीन तारुण्याची, मी खुश आहे ,माझ्या प्रेमाला तू पायदळी तुडवायला शिक, मी माझ्या आत्म्याची सगळी सुख तुझ्यावर ओवाळून टाकेन, पण तुझ्या सुखांना हिरावून नाही घेऊ शकत, मी स्वतः मृत्यूच्या दारात उभा राहील, पण तुला त्या दाराची हवा पण लागू देणार नाही, आपल्या प्रेमभंगापेक्षाही अजूनही खूप दुःख आहेत मला, पण ह्या दुःखाचं ओझं उचलता येत नाहीये, माझं एक घर आहे आणि त्या घरात एक आई आहे, दोन्हीही कधी विरून जातील याचा अंदाज पण नाही मला, तेंव्हा आत्म्याच्या सूक्ष्म कणांपासून तुला एवढंच सांगणं आहे, कि तू दुःखी राहून मला अजून दुःख देऊ नकोस…. |