मैत्री कविता मराठी | Maitri Kavita Marathi | Friendship poems Marathi

Maitri Kavita Marathi

मैत्री कविता मराठी – मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्रीवरील काही उत्तम मराठी कवितांचा संग्रह दिला आहे.  मैत्रीवरच्या या कविता लोकप्रिय कवींनी लिहिल्या आहेत.

     मैत्री हे असे नाते आहे.  ज्यामध्ये आपण आपल्या सर्व महत्वाच्या गोष्टी आपल्या मित्राला सहज बोलतो किवा share करतो.  जे आपण आपल्या फॅमिली मध्ये आई-वडील, भाऊ-बहिणींसोबत शेअर करत नाही, ते आपल्या मित्रांसोबत सहज शेअर करतो. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत मैत्री कविता मराठी, मराठी मैत्री कविता, Maitri Kavita Marathi, Friendship Maitri Kavita, Maitri Kavita In Marathi इत्यादी.

मैत्री कविता

1

मैंञीची वेल
एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी,
फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी .
मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी,
फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी.
उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल
त्यास अंतकरण आपल जोडाव लागत,
मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,
लाखो वर्ष जगाव लागत् .
फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी ,
मला पाहुणी .
न्यावे मला त्यांच्या सोबत,
कोठेतरी वाहुणी.
वाहुण मी त्या वेली सोबत जाईन
फुललेले हे सारे विष्व पाहिण.
फुललेले हे सारे विष्व पाहिण.

Friendship Maitri Kavita

2

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत….
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत बोलण
नाही झाल तरी आठवण नाही थांबत गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत परके
झाले तरी आपलेपण नाही सरत नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही
तुटत रक्ताची नसली तरी…..
काही नाती नाही तुटत एकहीमित्र
नाही असा माणूस कुठेच नसेल थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात
मैत्री ही हवीच कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते कशीही
असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!
रोजच् आठवण यावी असे काही नाही,
रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,
आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात…….

Maitri Kavita In Marathi

Maitri Kavita Marathi

3

मैत्री
” मैत्री “अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी…

4

मैत्री केली आहेस म्हणुन
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय…
गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..
मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातंजुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर,
कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं
देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..
पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते…फक्त जरा समजून घे ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..
दुसरं काही देऊनकोस जाणीवपूर्वक
‘नातं ‘ जप , मध्येच माघारघेऊ नकोस..

5

मैत्रीविना सारेच फिके
मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

6

मैत्री म्हणजे काय असत ?
मैत्री म्हणजे काय असत?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत?
की हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी मैत्री
असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलाखून चमचमणारी;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ….
रेशीमगाठी…

मैत्री कविता मराठी

7

मित्र हा असतो
पहाट सोनेरी किरणांची
नवीन आशेची नवीन विचारांची
एका स्वतंत्र आयुष्याची
जन्म अडतो अशा मैत्री वाचून
गरज हि प्रत्येक जीवनाची
मित्र हा असतो असा एक झरा
असतो ज्याकडे मनातील वसा
त्यावाचून खिडकीतून परततो गंध
न घेता वारा प्रत्येक घटनेचा इतिहास
तो पाहुल टाका दाही दिशा खाचखलाग्यावारुनी
लोटांगण घाली निस्वार्थ मैत्री हीच
त्याची शिधा व्यक्त करण्या आपल्या
भावना नसे गरज शब्दाची अबोल
डोळ्यातूनही वाचे गरज आपल्या आयुष्याची…

Friendship Maitri Kavita

8

मैत्रीमध्ये
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती,
तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची,
बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला,
मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे…

9

हल्ली बोलतच नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय,
जाताना बाय पण समोर असताना प्रश्नचिन्ह,
कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…
कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,पण इथुन तिथे जाताना कोणी
निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण,
कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता
शेवटपर्यत वाचतात, म्हणुन……..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….

Maitri Kavita In Marathi

10

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
एक प्रवास शुन्याचा जणु हीमालयाशी
भिडण्याचा शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..
एक प्रवास जगण्याचा क्षणा क्शणाला
माणुस घडवण्याचा हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..
एक प्रवास प्रेमाचा भुरभुरणार-या दोन जिवांंचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..
एक प्रवास प्रयत-नांचा सुख़ दुख़ातील
नाजुक क्षणांचा अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..
एक प्रवास.. तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा आठवु
म्हंटले तर आठवणींचा इथे हळुच
येवुन विसावलाय..एक प्रवास…

11

तुझी मैत्रि आहे
तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे
तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय जगण्याचा
नुसताच भास आहे तुझी मैत्रि आहे
म्हणुनच तुझ्यासमोर दोन
अश्रू ढाळू शकते वेड्या
या जगात जगण्याच्या मर्यादा
मी पाळू शकते तुझी मैत्रि आहे….
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता
दिवा जग जळतं माझ्यावर कारण
माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा..

Leave a Comment