विनोदी कविता मराठी | मराठी हास्य विनोदी कविता

मराठी हास्य विनोदी कविता.

विनोदी मराठी कविता – मित्रांनो, आज या पोस्टमध्ये मराठीतील काही उत्कृष्ट हस्या कविता दिल्या आहेत. जे खूप लोकप्रिय आहेत. या हस्य कविता प्रसिद्ध आणि लोकप्रिय कवींची काव्य निर्मिती आहे. हास्यकवींनी आपल्या हास्यकवितांमधून जीवनातील प्रत्येक पैलूंसह सर्व समस्या सोप्या भाषेत आणि हसतमुखाने मांडल्या आहेत.

Marathi Vinodi Kavita
Marathi Vinodi Kavita

1

*ती एकटीच दात घासतेस*
सकाळी हसतेस दुपारी हसतेस
संध्याकाळी हसतेस रात्री हसतेस
घरात हसतेस रस्त्यात हसतेस
येताना बघून हसतेस
जाताना बघून हसतेस
तिला काय वाटत ती
एकटीच दात घासतेस

2

बेवडे मित्र उठेना
अटक मठक रात्रभर भटक
मित्रांना लागली दारूची चटक
दारू लागली गोड गोड
बीयर ची बॉटल लवकर फोड
बीयर ची बॉटल संपेना बेवडे मित्र उठेना

Marathi vinodi kavita

3

बहिरी आहेस कि काय ?
प्रिये मी फुले मागितली तू मला पुष्पगुच्छ दिलास
मी दगड मागितले तू मला सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितले तू मोर दिलास
तू बहिरी आहेस कि काय?

4

जेव्हा तुला आगदी एकट वाटेल
जेव्हा तुला आगदी एकट वाटेल
नजरे सामोरे धुके वाटेल आसपास कोणीच दिसणार नाही
सगळे जग अंधुक होऊन जाईन तेव्हा ,
तू माझ्याकडे ये मी तुला डोळांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाईन .

5

तिचे अभंग, तिची गाथा !
सकाळी उठावे | सुसाट सुटावे |ऑफिस गाठावे | कैसेतरी ||इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||चढावे बशीत | गर्दीत घुशीत |रोज या मुशीत | कुटताना ||धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||
उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||
लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||
मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||
रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||
एक तो ‘वीकांत’ | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||
तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||
लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||
कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||
काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||
नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्‍हाणीं | सांगो नये ||
पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||
“अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||
प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||”
अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||
उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||
कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||
बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| ‘रुळ’लेली ||
विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||
काही न मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||
हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||
तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||
ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||
जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||
खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||
पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||

6

कार्ट प्रेमात पड़लय
हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……

Marathi Vinodi Kavita 7 to 15

7

उमेद
करत नाही काही कष्ट
तरी दुखतात पाय हात
रोज घासतो नेमाने तरी
किडत चालले आहेत दात
चाकरी करतो इमाने इतबारे
वापरत नाही जराही अक्कल
एवढी काळजी घेतो तरी
पडत चालले आहे टक्कल
दिसतो आता कसातरी मी
माझीच मला वाटते शरम
तब्येतही असते माझी थोडी
नरम थोडी गरम
काय होणार आहे माझं
वाटते मला सारखी भीती
नसते रोग लागलेत पाठी
गोळ्या तरी घेऊ किती
दिसत नाही नीट आता
नजरही झालीय अधू
इतकं सारं असूनही
हवीय मला तरुण वधू

8

आठवण काढीत जा कवा कवा
UR पोळी IM तवा,
UR खीर IM रवा,
UR पेढा IM खवा,
UR श्वास IM हवा,
अरे माझ्या मैत्रीच्या जिवा,
आठवण काढीत जा कवा कवा

9

बायको आणि ती
प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात येतात दोन जणी.एक बायको आणि एक ती ….कधी बायको आधी, अन नंतर येते ती.कधी बायकोच्या आधी, college पासून ती.मजेत असत married life त्या दोघीं मुळे,घरात बायको अन बाहेर तिच्या मुळे.दोघीं मुळे life कस comfortable असत.
घरात बायको अन बाहेर तिच्या वर dipend असत.
दोघीं बरोबर सगळ काही अस adjust होत,
life त्यांच्या शिवाय hell होऊन जात.
जरी असल्या दोघी तरी काही problem नसतो.
बायकोच अन तीच relation normal असत.
फिरायला तिघही एकत्रच असतो,
दोघीनाही कारण काहीच complex नसतो.
काय म्हणता? आयुष्यात तुमच्या नाहीत दोन जणी?
म्हणजे लग्न झाल नाही? का नाही तुमच्या कडे गाडी?प्रत्येक पुरशाच्या आयुष्यात असतात दोन जणी
एक बायको आणि एक गाडी…
कधी बायको आधी, अन नंतर येते गाडी.
कधी बायकोच्या आधी, college पासून गाडी.
जितक्या जुन्या तितक्याच दोघी आवडत असतात
कितीही दिला त्रास तरी हव्याहव्याशा वाटतात.
जुनी बायको अन जुनी गाडी सारख्याच असतात,
ज्याच्या असतात त्यालाच त्यांचे नखरे माहित असतात.
देखणी बायको दुसर्याची, तरी आपली सोडववत नाही
नवीन model छान तरी जुनी गाडी बदलवत नाही.
बायको जाता माहेरी घराबाहेरच रहाव वाटत.
गाडी जाता ग्यारेजला घरातच बर वाटत.
कलियुगी पती – चारित्र्याची हीच खरी निशाणी,
आयुष्यभर व्रती जो, एक पत्नी, अन एक गाडी.

10

प्रेमाला उपमा नाही
प्रेमाला उपमा नाही ,
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पम्प नाही,
पम्पाला पैसे नाही,
पैस्याला नौकरी नाही,
नौकरीला डीग्री नाही,
डीगरीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरीन्शीवाय प्रेम नाही,
म्हणून प्रेमाला उपमा नाही ..

11

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं ?
होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस नुकत्याच
धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू क्रिकेटात तुमची
ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू लवकर गेलात स्टॉपवर
की बस येते लेट एरवी वेळेवर धावलात तरी चुकते
तिची भेट विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या रस्त्यावरचा
मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला पंक्चरायला तुमचंच चाक
पडलेल्या काट्याला निवांत येऊन टीव्हीसमोर बसता
तेव्हाच वीज जाते देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला
जाते ‘व्हाय मी’ हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न
चुकता मग ‘लकी शर्ट’ आणि लकी दिवस हेरून कामं करता

12

प्रेयसी असेपर्यंत
प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं बायको
झाल्यापासून भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील हिरवी
पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा…
प्रेयसी असतांना,
“तू म्हणशील तसंच होणार”
असं सारं नेहमी म्हणायची,
आता मात्र माझ्यावरंच वेळ आली आहे रडायची,,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं…
प्रेयसी असतांना,
वेळ देत नाही म्हणायची बायको म्हणुन
सोबत असतांना काय दिवे लावतेय,
“आमचं किती प्रेम आहे”
असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा…प्रेयसी असतांना,माझ्याकरीता तुला खुपगोष्टी कराव्याश्या वाटायच्या,बायको झाल्यानंतर मात्र कणिक तूमळायचीस अन पोळ्या मी लाटायाच्या..?उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं…
प्रेयसी असतांना,
तुला सोडुच नये असं वाटायचं बायको
झाल्यानंतर कधी एकदाचं सोडतो असं झालंय,
कामे दोघांनी करायची असतात पण तू माझं
ओझ्याचं गाढव केलंय,,
उरलं आहे ते फ़क्त ओझं
वाहता-वाहता जीव सोडायचं..

13

ऐक क्वार्टर कमी पडते
दारु काय गोष्ट आहेमला अजुन कळली नाहीकारण प्रत्येक पीणारा म्हणतोमला काहीच चढली नाहीसर्व सुरळीत सुरु असतानालास्ट पॅकपाशी गाडी अडतेदर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्या पेक्षा मोठा असतोअसतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा कार्यक्रम पीणार्याऐला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा पीण्याचा
क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दा‍रु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीणार्या मध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते ;D
चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी
त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते :-[
फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते…
यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहेबीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते…

14

मरणाचा अर्ज
यमाच्या ऑफिसात मरणाचा अर्ज केला
“रिसन फॉर डाइंग”म्हणून त्यांनी फॉर्म
भरायला दिला पहिला टेक्नीकल राउंड झाला
डोळे रोखून तो मला म्हणाला
so Mr. why should we choose YOU for death?
मी पूर्ण कहाणी सांगीतली त्यालाही ती होती पटली मग
Hr शी डिसकशन झाल तिने मला expectation
विचारल मी म्हणालो तात्काळ मरण चालल ती म्हणाली
“is it negotiable?”
मग अपघात फायनल ठरला वेळेवर
ठरल्याप्रमाने घडला पण चार दिवसानंतर माझा
हॉस्पिटल मध्ये डोळा उघडला मी लगेच यमलोकात
फोन केला म्हणालो मी अपघातात वाचलो
मग आता करणार का माझा खून?
यमलोकातली HR बोलली
“we will get back to you soon….”

15

काय सांगू राव
ती आली online कीमाझा पीसी Hang होतोमनात कससंच होवूनसारंच Zing Zang होतंकितीही Alt+Ctrl+Delete केलेतरी Task manager येत नाहीहैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही
Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो
काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते
काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं….?अहो मग मी…..
तिच्या शिवाय कसं जगायचं….??
अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो…..?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो …

Marathi Vinodi Kavita 16 to 24
16

पाली गं पाली
पाली गं पाली येऊ नको खाली
घाबरलेली श्वेता घामाने न्हाली
पाल जशी जशी खाली येऊ लागली
श्वेता पण तशी तशी दूर पळू लागली
पालीला बघून श्वेता असली घाबरली
म्हणते कशी ‘वाचव मला विठू माऊली’
पळून पळून श्वेताची दमछाक हो झाली
दमुन भागुन श्वेता निद्रेधिन झाली / झोपी गेली
जाग आली जेव्हा, श्वेता पालीला शोधू लागली
आता कुठे ही पाल गेली? दिसेनाशीच झाली ?
पाली गं पाली, पाली गं पाली

17

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी
लेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवलीसकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरतीइकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यानलाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावलाजाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्‍या त्या बघा गोरीच्यादिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मकपोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत
म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल
कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो
गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर
तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन
मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!

18

Syllabus जरा जास्तच आहे
Syllabus जरा जास्तच आहे दर वर्षी वाटतो…
Chapters पाहून Passing चा Problem मनात दाटतो…
तरी lectures चालू राहतात डोक्यात काही घुसत नहीं….
चित्र-विचित्र figures शिवाय Board वर काहीच दिसत नाही….
तितक्यात कुठून तरी Function ची Date जवळ येते…
Sem मधले काही दिवस नकळत चोरून नेते…
नंतर lecturers Extra घेउन भरभरा शिकवत राहतात…
Problems Example Theory सांगून Syllabus लवकर संपवू पाहतात…
पुन्हा हात चालू लागतात… मन चालत नाही….
सरांशिवाय वर्गामध्ये कुणीच बोलत नाही…
Lectures संपून Submission चा सुरु होतो पुन्हा खेळ..
assignment Complete करण्यामध्ये फार फार जातो वेळ…
चक्क डोळ्यांसमोर Syllabus चुटकी सरशी sampun जातो..
‘PL’s मध्ये वाचून सुद्धा Paper काबर सो…सो..च जातो???

19

प्रश्न आणि उत्तर
माझा नाकारावर रूसलेल्या त्या मोहनांगीने मला विचारले-
“का नाकारलस तू मला ?
वाटत नाही का सुंदर मी तुला? ”
जणू मी संकष्टात पडलो…
की- “हे कसे समजवायचे तिला ?”
जेव्हा तिने खरं सांगण्यास शप्पथ घेतली-
मी सत्यवचनाची प्रत हातात घेतली….
वाचून सांगितला मी तिला-
“पहिले “declaration”‘For safety’-
म्हणून- जबाबदार तुम्हीच हे ऐकल्यावरचा परिणामांना-
ऐकू शकले नाहीत तर द्या बोट कानांना”
म्हणालो मी तिला- “तुझे- ते रेशमी केसं,
गुलाबी गाल, मधूंनी भरलेले ओठ, मादक डोळे…
चाफ्या सारखा नाक..
चंद्रमाचा चेहरा…
वेड लावणारा तो सौंदर्य..गज- गमनेची ती चाल..मंद- गमनेची ती बोली… -हे सर्व पाहून मला वाटले,की – मी तुला “शोकेस”-मधे ठेऊ शकतो -हृदयात नाय…..

20

प्रेम पत्र
प्रिय ….. ,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण,
की मला तू खूप आवडते.
तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं,
मी पण तुला आवडतो.
मी जर तुला आवडत असेन,
तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ.
तुझ्यामागं मंदाकिनी बसते ना,
ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई सोडते.
मला खूप राग येतो.
ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या
घराची बेल वाजवून पळून जातो.
तू ‘फेअर अँड लव्हली’ लावत जा.आणखी गोरी होशील.तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणिसोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत.पण मला नाही आवडत त्या.पत्राचा राग आल्यास मला परत दे.सरांना देऊ नकोस.

21

पाहणीचा कार्यक्रम
काका माहे मले म्हणे पोरगी पाहिजे कशी म्या म्हंटल कऊन,
त म्हणे फुटली तुले मिशी लाज येत नसतांनाही मी लाजून
हसलो जास्त गोष्टी व्हाव्या म्हणून तांच्या तोंडा म्होर बसलो
इचार केला मना मंदी चांगलाच दिवस आला बिना झोडप्यानच
जसा सरप मरून गेला म्हंटल उरकून टाकाव आता आली आहे
त बारी करून टाकाव लगीन, पाहून पोरगी कोरी कारी पोरींच्या
पत्त्यांची मग निघाली जेव्हा ‘लिस्ट’ म्हंटल देवा ह्यांच्या मद्धे
कोण असल ‘फर्स्ट’ पत्ते निवडतांना मात्र, खराब होती एक
गोष्ट मी र्ह्यायलो बाजुले बाकीचेच बोले जास्त निवडलेल्या
पत्त्यातून मग म्याय मारली नजर कल्पनेच्या जगात तर
सार्याच वाट्या ‘बेटर’ तारीख घेतली जवळचीच,
बाकीच्यांच्या सोयीन जायले म्हणे सुमोची टाटाच पाहिजे,
जाव कस ‘एस. टि.’ न म्याय म्हंटल लेकहो,
धून घ्या वाहत आहे त गंगा नाही त एक एक जन फिरत
असते जसा गंगू तेली नंगा दिवसां मागून दिवस गेले ,
तारीख आली दिवाई वाणी सकाळीच आन्घोड उरकून
सजलो जसा “जानी”एका मागून एक पाहुण्यांची जत्रा
अशी भरली पांढरे कपडे घालून बगड्यांची सभा
जशी बसली गाडी आली ‘डायवर’ सहित,
रंग बी होता मस्त पाहुण्यांकडे पाहून
वाटे गर्दी झाली जास्त एक एकानी सारेच,
गेले गाडी मध्दे जावाई मात्र गिरक्या मारे,
पाहून ‘फ्रंट सीट’ कडे सगडे केले ‘Adjust’,
कोणी मधात, कोणी पुढ कार्यक्रमाचा ‘हेरो’ मी मात्र माग,
जसं बांधल कोणी घोडं रस्ता होता एकच तासाचा,
त्यातही घेतला ‘स्टोप’ कुणी गेला हिवरा मांग,
कुणाला पाहिजे होता ‘गोल्ड स्पॉट’ पान, बिड्या,
मावा सगळ आमच्याच सौजञान तोंड नाही रिकामं
ठेवल एकाय पाहुण्यान उठत बसत कसा तरी मोर्चा
गावात शिरला वाटे जसा “वास्को द गामा”न
भारताचा शोध लावला पुढच्या ‘सीट’ वरून आवाज आला
बगावतीचा म्हणे एकही जन नाही आला,ऐकून आवाज गाडीचा गाडीतूनच उतरता उतरताझाकून पाहिलं घरात म्हंटल आल्या आल्याच पाहूनघ्याव काय पडणार ते पदरात पायधुन्यासाठी गंगायपाण्यान होत भरलं हात पुसासाठी टावेल घेऊन बारकपोट्ट होत ठेवल या या करत आमचा घरात झाला प्रवेश ताठबसले आमचे गडी आणून भलताच आवेश पयले आलं पाणी,
मंग आले पोहे आमच्या मंडळींनी मग गीयले गोयेच्या
गोये ज्याच्या साठी आलो त्याचाच न्हवता पत्ता सारेजण
कुटत बसले गोष्टींचाच बत्ता झाक पडलेली पाहून मंग येयले
जाग आला पोरगी पाठवा म्हणून कोणी सांगावा धाडला आता
पर्यंत माह्या कामाचं काहीच न्हवतं झालं आता ‘पिच्चर’ सुरु होणार खरा,
म्हणून मन सेसावल पोरगी येऊन बसली जशी हरीण तावडीत
फसली जावयाच्या डोक्यात प्रश्नांची ‘लिस्ट’ मला दिसली पाठ
केल्यावानी उत्तर प्रश्नांचे तीन दिले म्हाया मना मंदी पार
घर करून गेले पाया पडली सर्वांच्या आणि
वसूल केले पैसे आम्ही आपला खर्च कराव,
येयन कमावून घ्याव असे नाकी,
डोई सुंदरच होती,
बोट नाही दाखवाले पोरगी मले भारी आवडली सांगाव कस,
कोणाले तोंडावरचा आनंद पाहून साऱ्यांच्याच ते
लक्षात आलं दारा मागच्या फटीतून तिच्या आईनबी मले
पाहिलं आजचाच दिवस आहे म्हंटल आपल्यालाबी कोणी
पायते रस्त्यावरून जातांना एरवी कुत्रेच मागे धावते
एकदा अजून चहा घेऊन आम्ही निघालो परतीला
मित्रांचा आमच्या पार्टीसाठी तगादा तवाच
सुरु झाला घरी आल्या आया बाया,
वाटच होत्या पाहत पहिला प्रश्न पसंतीचा
गेल्या बरोबर दारात मी बोलण्या आधी काकान ठेवला
खांद्यावर हात आता म्हणे तयारी करा, सून आणायची
हाये घरात सगळीकडे कसा आनंदाचा पूर आला माया
मना मंदी त जसा मोगराच बहरला सर्वांसाठी हीच कहाणी,
हाच आहे रस्ता कुणी जाते महागात,
कुणाला मात्र पडतो सस्ता.

22

आयला तिच्या
आयला तिच्या मायला ह्या पोरी काऊन
अशा पोट्टे लेकाचे मागे त्यांच्या लागे घेऊन
हाती मिशा सगळंकाही पोरं आताची विकुन
टाके त्यांच्यासाठी पन् पोरिंना घाम काही कधीच आला नाही…
पोट्टं म्हणे पोट्टीले मले तु आवडतेस तशी लई भारी…
अदा तुझी मिरची जशी आहे अलग न्यारी…
आयला तिच्या मायला पोट्टी फक्त हसून जाते हसली
म्हंजे फसली पोट्ट्याची झोप उडून जाते…
अचानक पोट्टी त्याले भलत्याच सोबत दिसते हसत
हसत पोट्टी सांगते हा माह्या नवरा होनार म्हंते आयला
तिच्या मायला पोट्ट्याले काहीच समजत नसते दारु
प्यायची म्हनतो लई पन् त्याचदिवसी ड्राय डे असते…
आयला तिच्या मायला त्याले राग भलता येतो ह्या पोरी
काऊन अशा त्याले प्रश्न असा पडतो म्हने ह्यांच्यापायी
आमचे खिशे कधीच फाटुन गेले सिनेमाची तिकीटं अन्…
रेस्टॉरेंटची बिल राहुन गेले..काय करावं कळेना आता ह्या पोरींचा जुना
फंडा मिठासोबत जखमांवरती मारेल फेकुन अंडा…
चायला तिच्या मायला पोट्ट्याच्या
मनात सदा येई शिव्याशाप देई तिले…
म्हने तुही दुनिया जळुन जाई…
पन् काय करावं पोट्ट्यांचे मन लयच भावनीक
असते पोट्टी कधीच इसरुन जाते..
पन् तो तिले आठवत बसते कितीही म्हटलं तरी
त्याची तिले हाय लागत नाही कारण प्रेम असतं…..
च्यामायला त्याचं तिच्यावर म्हनतो….
जा सदा सुखी रहा…
दुसरं काही मागत नाही…
दुसरं काही मागत नाही…

23

देवदास
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले..
आता डोळे सुद्धा सुकून गेले.. तिनं अस का केलं ?
उत्तर काही मिळणार नाही.. आता आई शप्पथ सांगतो..
परत प्रेमात पडणार नाही.. नसेल जाण, तर गेली उडत..
मी खैर करणार नाही.. आई शप्पथ सांगतो..
परत प्रेमात पडणार नाही.. पहिल्यांदा CANTEEN मध्ये पाहिलं तिला,
च्यायला काय दिसत होती… अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा,
अप्सरा जणू भासत होती.. मी ‘आ’ वासून बघत राहिलो…
तसं अख्खं कॉलेजच ‘चाट’ पडलं होतं.. माझ्या त्या BORING LIFE मध्ये,
काहीतरी INTERESTING घडलं होतं.. पण.. आता हा सलमान,
आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही.. आई शप्पथ सांगतो..
परत प्रेमात पडणार नाही.. SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली,अन् चक्क ती माझ्या नजदीक आली, DARING करून ‘मारला’ PROPOSE…
ती लाजून ‘इश्श’ म्हणाली.. ( ती तिकडे ‘इश्श’.. आम्ही इकडे ‘खुश्श’.. )
अहो काय SIXER मारली होती आपण?..’युवी’ने सुद्धा सलाम ठोकला असता..
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. ‘T20’ MATCH वाटली का तिला??..
की झटपट उरकून गेली.. जन्मभराची ‘कसोटी’…
पण स्वतः ‘RETIRED’ आणि मला ‘HURT’ करून गेली..
पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..
सारस-कात्रज बाग तर सोडाच… आम्ही Z-BRIDGE सुद्धा सोडला नाही..
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती…सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..पै-पै’चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण तसलं काही करणार नाही..आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही.. काय झालं असेल हो?का सोडलं असेल मला? खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय.. एकदा भातुकली मोडलीय..
आता परत खेळ मांडणार नाही.. आई शप्पथ सांगतो..
परत प्रेमात पडणार नाही.. म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन या पोरींच काही सांगता नाही येत..
कधीही CHOICE बदलू शकते आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते

24

मी आहे जवान
अवघे ऐंशी वर्षाचे वयोमान,
लग्न आधी असतो जवान,
कपालावर छपन्न आट्या मारतो
सगळ्याना काट्या फुटले दोन्ही
कान लावतो सगळ्याना ध्यान डोळ्यांवर
लावतो दोन भिंगांचा चष्मा दाखवतो
बायकांना करिश्मा डोकिस टक्कल असते
भान वयाचे नसते काठी वाचुनी कधी
ना चालतो उसनी घेउन एट दाखवतो
काय दिसते ध्यान म्हणतो मी आहे जवान

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi

Leave a Comment